चीनमध्ये एकाच ठिकाणी एक लाख गाेवंशाचे गायरान

    01-Apr-2021   
Total Views |
चीन हा कांही भारताचा मित्र देश नाही. तरीही तेथे घडणाऱ्या गाेवंशविषयक घटनांची भारताने दखल घेण्याची आवश्यकता आहे
 
c_1  H x W: 0 x
 
सध्या एक लाख गाेवंश एकाच ठिकाणी सांभाळण्याचे एक प्रचंड माेठे गायरान ईशान्य चीनमध्ये तयार झाले आहे. प्रथम तेथे चाळीस हजार गाेवंश हाेता पण त्यात अजून साठ हजाराची नवी भर घातली आहे. वास्तविक चीन हा कांही भारताचा मित्र देश नाही. तरीही तेथे घडणाऱ्या गाेवंशविषयक घटनांची भारताने दखल घेण्याची आवश्यकता आहे कारण अगदी दहा पंधरा वर्षांपर्यंत त्या महाकाय देशाने गाेपालनावर दुर्लक्ष केले हाेते. एकूण चीन हा देशच गाय न पाळणारा देश याच दृष्टीने परिचित हाेता. पण गेल्या दहा वर्षात चीनने गाय आघाडीवर बरेच अंतर कापले आहे.तेथील जे गरीब प्रांत आहेत, तेथील शेतकऱ्यांना गेल्या दाेन वर्षात गाेवंश दिले आहेत, त्याचा उपयाेग त्यांना दूध आणि शेती या दाेन्हीसाठी हाेईल, असा त्यांचा दृष्टिकाेन आहे. चीनमधील सर्वांत गरीब प्रांत म्हणजे ङ्गगन्सूफ या प्रांतात चीनने तेथील शेतकऱ्यांना पाच काेटी गाई दिल्या आहेत. गरिबी असण्याच्या मालिकेत असे नंतरचे दहा प्रांत आहेत, त्यांताही तेथेही कांही काेटी गाई दिल्या आहेत. पण गन्सू प्रांतात सर्वात अधिक आहेत. ईशान्य चीनमध्ये जे एक लाख गाेवंशाचे गायरान उभे राहिले आहे, त्याचा उद्देश प्रामुख्याने रशियाला दूध पाेहाेचवणे, हा आहे. रशियाला दूध पाठवण्यास युराेपीय देशांनी नकार दिला हाेता.हा विषय वाचताना शेतीमध्ये आणि गाेविज्ञानात रस घेणाऱ्या तरुणांनी या विषयातील बारकावे तपासून बघणे आवश्यक आहे. चीन आपले मित्र राष्ट्र नसताना त्यांच्या माहितीची आपल्याला गरज काय, अशी पहिली शंका तरुणांच्या मनात येणे आवश्यक आहे. दुसरे असे की जाे देश अजूनही न्यूझीलंडवरून दूध मागवताे, त्या देशाला रशियातील दूध टंचाईची काळजी वाटण्याचे कारण काय आणि या पुढील एक प्रश्न भारतीय तरुणांच्या मनात आला पाहिजे. ताे म्हणजे जगभरातील काही लाख आणि कांही काेटी गायींचे दूध इकडून तिकडे जात असते, त्यात आपण काेठे आहाेत आणि आज जरी काेठेच नसलाे तरी येणाऱ्या काळात तरी आपण काेठे असणार आहाेत.चीन प्रत्येक गाेष्ट आपल्याला महासत्ताफ व्हायचे आहे, या दृष्टिकाेनातून करत आहे. पण आपणही आपल्या क्षेत्रात त्या दृष्टीने आरंभ कसा करायचा, असा विचार आजच सुरू केला तरच आपले एक एक पाअूल पुढे पडणार आहे.
माेरेश्वर जाेशी, 9881717855