गाेहत्याबंदीवर सिद्धरामय्या यांची दुताेंडी विधान

    09-Mar-2021   
Total Views |
कर्नाटक राज्य विधानसभेत गाेहत्याप्रतिबंधक कायदा संमत झाल्यावर ताे प्रत्यक्षात येण्यासाठी प्रत्येक दिवशी नवीन अडचणी येत आहेत.
 
g_1  H x W: 0 x
 
समाजातील आणि राजकारणातील संधिसाधू माणसे परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी किती टाेकाला जाऊ शकतात, याचे ते उदाहरण आहे. तेथील विधानसभेत हा कायदा संमत झाला; पण विधान परिषदेत ताे संमत झाला नाही. कारण तेथे काँग्रेस आणि जनतादल सेक्युलर या पक्षांचा प्रभाव आहे, तेथील राज्य सरकारला वटहुकूम काढावा लागला.ताे वटहुकूम काढल्यावर साहजिकच ताे कायदा अस्तित्वात आला. पण, त्यावर तेथील माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दुताेंडी भूमिका घेतली. तेथील एक नागरिक माेहंमद आरिफ जमील यांनी तेथील उच्च न्यायालयात गाेहत्याबंदीच्या अध्यादेशावर जी याचिका दाखल केली.वास्तविक सिद्धरामय्या ज्या काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधित्व करतात, त्यांचा गाेहत्याबंदीशी अधिक जवळचा संबंध आहे. प्रत्यक्षात त्यांच्यापैकी ते काेणीही मान्य करणार नाही. कारण तसे करणे आज त्यांना साेईचे नाही. स्वातंत्र्यचळवळीत महत्त्वाची भूमिका असणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रत्येक अधिवेशनात गाेहत्याबंदीबाबत चर्चा हाेत असे. महात्मा गांधी यांनी तर अनेक वेळा या विषयावर काँग्रेसच्या अधिवेशनातील व्यासपीठावरून ‘या देशाचा विकास हा गाेपालनाशी व गाेहत्याबंदीशी जाेडला आहे’ असे अनेक वेळा बाेलून दाखवले आहे.एवढेच नव्हेतर एका ब्रिटिश मुत्सद्याने एकदा ‘तुम्ही गाेहत्याबंदीबाबत एवढे आग्रही आहात, तर मग तुमच्या समाेर गाेहत्याबंदी आणि देशाला स्वातंत्र्य असे दाेन पर्याय ठेवले, तर काेणता पर्याय निवडाल,’ असा प्रश्न विचारला, तर त्याला महात्मा गांधींनी ‘गाेहत्या बंदीला प्राधान्य देईन’ असे उत्तर दिले. पण, कर्नाटक विधानसभेत गाेहत्याबंदी विधेयक संमत झाल्यावर ‘मी गाेमांस खाल्लेतर तुम्ही जाब विचारणारे काेण?’ अशी प्रतिक्रिया विराेधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी दिली.हे विधान त्यांनी केवळ खाजगीत किंवा पत्रकारांशी बाेलताना केले असे नव्हेतर तेथील काँग्रेस भवनातील काँग्रेसच्या वर्धापनदिनाच्या अधिकृत कार्यक्रमातील त्यांच्या भाषणात बाेलताना केले. एवढे बाेलून ते थांबले नाहीत, तर काँग्रेसचे आमदार यावर स्पष्ट बाेलायला कारण नसताना बिचकतात. मला जे म्हणायचे आहे तेच त्यांनाही म्हणायचे आहे, असेही बाेलून दाखवले. या घटनेनंतरच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी या विषयावर केंद्रानेच कायदा करावा आणि गाेहत्याबंदीबराेबरच गाेमांसाची आयात आणि निर्यात यावरही बंदी घालावी, अशी मागणी केली.
 माेरेश्वर जाेशी, 9881717855