गाेमांसासाठी नेल्या जाणाऱ्या गाईंना आणि गाेमांसाच्या साठ्यावर ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या महिला पाेलिसाच्या गळ्याभाेवती गाईंना पकडण्याच्या दाेरखंडाचा फास टाकून त्या महिला पाेलिसास फरफटत नेल्याचा प्रकार उत्तर प्रदेशातील सथला गावी घडला आहे.
यात महिला पाेलीस तर गंभीर जखमी झाली आहेच पण तिच्याबराेबर असलेले दाेन पाेलीसही जखमी झाले आहेत. देशात सध्या गाईचे दूध, शेण, गाेमूत्र यांच्या आधारे जीवनात लागणाऱ्या अनेक बाबी चांगल्या स्वरुपात आणि अतिशय कमी किंमतीत निर्माण करण्याचे युग सुरू झाले आहे. त्याला माेठा प्रतिसादही मिळताे आहे. तरीही येथील लाेकांच्या भावनांना ठेच पाेहाेचेल, असेच वागण्याची गेल्या तेराशे वर्षाची सवय अजून गेलेली नाही.दि. 12 जानेवारीला घडलेली ही घटना मीरत जिल्ह्यातील सथला गावची आहे.त्या संदर्भात पाेलिसांनी अमजद कुरेशी, फुरकम कुरेशी, अफक कुरेशी, झेद कुरेशी, आफरीन, वाशिम कुरेशी, िफराेज कुरेशी, अमजद कुरेशी आणि महाराज नावाची एक व्य्नती असून त्यांच्यावर पाेलीसाच्या खुनाच्या प्रयत्नाचा आराेप ठेवला आहे. या संदर्भात एक व्यक्ती आणि दाेन महिलांना अटक करण्यात आली आहे.मंगळवार दि. 12 जानेवारी राेजी घडलेल्या या घटनेत मन्ना पाेलीस स्टेशनच्या हद्दीत गाेहत्येसाठी गाईंची तस्करी हाेत आहे आणि त्यांच्याजवळ गाेमांसही आहे, अशा स्वरूपाची माहिती पाेलिसांना मिळाल्यावर स्थळ नावांच्या गावांच्या हद्दीत कांही पाेलिसांना पाठविण्यात आले. पाेलीस आल्याचे समजल्यावर त्या तस्कराच्या टाेळीने पाेलीसांवरच हल्ला चढविला. तरीही पाेलीस मागे हटत नाहीत, असे पाहिल्यावर त्या वाहनातून पळून जाणाऱ्या त्या टाेळीने पाेलिसांपैकी महिला पाेलिसांच्या गळ्याभाेवती गाई पकडण्याच्या दाेरखंडाचा फास टाकला आणि तसेच फरफटत नेले.
अन्य पाेलिसांनी ताेच दाेरखंड पकडून फरफटत जात त्या महिलेचा फास साेडविला पण ताेपर्यंत ती महिला बरेच अंतर फरफटत गेली हाेती. त्यात ती गंभीर जखमी झाली. तस्करांनी जीवघेणा हल्ला करूनही पाेलीस मागे हटत नाही आहेत असे पाहिल्यावर त्यांनी पाेलिसांवर दगडांचा वर्षाव करायला आरंभ केला.ताेपर्यंत ही बातमी अन्य पाेलीस चाैक्यांना समजल्याने त्यांनीही पाेलिसांचे गट पाठवले. त्यामुळे हल्लेखाेर पळाले.पाेलिसांनी पाठलाग करून त्यापैकी तिघांना ताब्यात घेतले. पाठाेपाठ कांही ठिकाणी छापे टाकले. त्यात तीन क्विंटल संशयित मांस, जनावरे कापायच्या सुऱ्या, तीन वाहने जप्त केली.
माेरेश्वर जाेशी, 9881717855