शेणाच्या पणतीचा दिवा पर्यावरणही शुद्ध करेल

    06-Mar-2021   
Total Views |
सारी यज्ञसंस्था ही गाईचे तूप आणि शेणाच्या गाेवऱ्या यावर उभी आहे.भारतीय गाईंच्या सान्निध्यात ऋषिमुनींनी अनुष्ठाने केली म्हणून गाईचे महत्त्व स्पष्ट झाले. गाईच्या शेणाच्या पणतीचा दिवा जर संध्याकाळी घराच्या दारात लावला, तर घरात प्रसन्न वातावरण तर हाेतेच; पण डांसही कमी हाेतात.
 
v_1  H x W: 0 x
 
भारतीय सांस्कृतिक जीवनात जे गाईचे महत्त्व आहे, त्याचे बारकावेही तेवढेच महत्त्वाचे आहेत. गेल्या पन्नास वर्षांत जगभर पंधरा वीस लाखांपेक्षा अधिक लाेक अग्निहाेत्र करतात.अग्निहाेत्राच्या एक किमी परिसरात पाॅझिटिव्ह वातावरण असते आणि पिकेही चांगली येतात. यावर प्रचंड वायय उपलब्ध आहे.सारी यज्ञसंस्था ही गाईचे तूप आणि शेणाच्या गाेवऱ्या यावर उभी आहे.भारतीय गाईंच्या सान्निध्यात ऋषिमुनींनी अनुष्ठाने केली म्हणून गाईचे महत्त्व स्पष्ट झाले. गाईच्या शेणाच्या पणतीचा दिवा जर संध्याकाळी घराच्या दारात लावला, तर घरात प्रसन्न वातावरण तर हाेतेच; पण डांसही कमी हाेतात.ही सारी उत्तरे आपल्याला भारतात गाेविज्ञानाचा वापर वाढवावा, या मर्यादित उद्देशाने द्यायची नाहीत, तर जगातील बिकट समस्या सुटल्या, तर केवळ आर्थिक फायद्याच्या आकर्षणाने गाे जीवनाचा ते स्वीकार करतील. त्यामुळे सध्या दरवषीं शंभर काेटी गाेवंश हा राेगांचे आगर बनून मारला जात आहे, त्यापासून जगातील माणूसच परावृत्त हाेईल. सध्या आपण काेराेनाच्या काळात आहाेत, काेराेनाचे संकट टाळण्यासाठी जगातील एक एक व्यक्ती, एक एक देश, महासत्ता आणि जागतिक संघटनाही प्रयत्न करत आहेत.हे मुद्दे जगाने स्वीकारावे असे वाटत असेल, तर ते प्रत्यक्षात आणले पाहिजे. गाेविज्ञान संशाेधन संस्था, पुणेच्या माध्यमातून ते काम हाेतच आहे. हे प्रयाेग कधीही प्रयाेगशाळेपुरते मर्यादित राहून चालत नसतात. ते घराेघर वापरताना दिसावे लागतात. यातील शेणाच्या पणतीपासून जरी आरंभ केला, तरी ती पणती हळूहळू जगातील समस्या दूर करील. प्रत्येक भारतीयाच्या मनात गाेरक्षणाची भावना सुप्त स्थितीत असते.त्यालाही चालना मिळेल.
 माेरेश्वर जाेशी, 9881717855