सामान्य माणसाच्या जीवनात नवा अध्याय सुरू करण्याची जी गाेविज्ञानाची क्षमता आहे, ती जाेपर्यंत जागी हाेत नाही, ताेपर्यंत ताे विषय नीट पूर्ण झाला असे म्हणता येणार नाही.
गाेआधारित शेतीची ही मध्यवर्ती प्रक्रिया असली, तरी शेतीच्या त्या त्या वेळच्या समस्यांसाठी काही काढे, पाणी पाजण्याच्या काही पद्धती, काही नियम आहेत. भारतात आज अनेक गाेविज्ञान संशाेधन संस्था यावर काम करत आहेत.पुण्याच्या संस्थेचा संपर्क क्रमांक अनिलजी व्यास -8888871310 असा आहे, तर नागपूर जवळील देवळापार येथे असणाऱ्या गाेविग्यान अनुसंधान संस्था, नागपूर, फोन- 0712-2772273 असा आहे. तेथे सतत देशभरातील शेतकरी कार्यकर्त्यांचे अभ्यासवर्ग सुरू असतात.यातील महत्त्वाची बाब म्हणजे प्रत्येक भागातील गरजेनुसार तेथील लाेकांनी अमृतपाणी बनविण्याची प्रक्रिया तयार केली आहे.शेती हा येथील अर्थव्यवस्थेचाही गाभा आहे आणि समाजव्यवस्थेचाही गाभा आहे. प्रत्येक घरी गाय पाहिजे व गाईला दरराेज आपल्या जेवणापूर्वी गाेग्रास दिला पाहिजे, हा संकल्प गाईला गाेमाता किंवा देवता मानण्याच्या संदर्भात ठीक आहे.पण, गाय ही आर्थिक फायद्याची झाली नाही, तर फक्त मंदिरापुरती गाय यापुढे ती कल्पना फार टिकणार नाही. प्रत्यक्षात अशी वस्तुस्थिती आहे की, वरील गाईच्या फायद्याच्या यादीपेक्षा अनेक असे फायदे आहेत. दिल्ली आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी गाेवंशाच्या फक्त शेणातूनच चांगला फायदा मिळवण्याची पद्धत विकसित केली आहे. पाेकळ नळीसारख्या गाेवऱ्या केल्या, तर कसलेही प्रदूषण न हाेता गॅसपेक्षा स्वस्त पडेल असे इंधन मि ळते. अशा प्रयाेगाची न संपणारी मालिका आहे. गाईचा शेतकऱ्यांना कसा उपयाेग हाेऊ शकताे, या विषयावर मी गेल्या चार वर्षांत साडेबाराशे लेख लिहिले. तीन लाख एबीसी सर्क्युलेशन असलेल्या दैनिकात ते प्रकाशित हाेत आहेत. त्याला मिळणारा प्रतिसाद फारच प्रचंड आहे.सध्या जे गाेहत्याबंदीचे कायदे केले आहेत, त्या गाईसाठी सरकारच्या जबाबदाऱ्या आणि जनतेचे दातृत्व यांच्या आधारे पेलल्या जाणार आहेत. पण, सामान्य माणसाच्या जीवनात नवा अध्याय सुरू करण्याची जी गाेविज्ञानाची क्षमता आहे, ती जाेपर्यंत जागी हाेत नाही, ताेपर्यंत ताे विषय नीट पूर्ण झाला असे म्हणता येणार नाही.
माेरेश्वर जाेशी, 9881717855