पराशर संहितेतून पुढे आलेले गाेविज्ञान

    04-Mar-2021   
Total Views |
प्रथम शेतीतील संशाेधनाचे मुद्दे समजावून घेणे आवश्यक आहे. पराशर ऋषींच्या ज्या संदर्भाच्या आधारे ‘ऋषिकृषी’ पुस्तकाचे लेखक माेहनराव देशपांडे यांनी जी पद्धत पुरस्कारली आहे, ती प्रामुख्याने तीन सूत्री आहे.एक म्हणजे बीज प्रक्रिया, दुसरी अमृतपाणी सिंचन आणि तिसरे म्हणजे गाेमूत्रपाणी सिंचन.
 
स,_1  H x W: 0
 
काेरडवाहू पिके, पडीक जमिनीतील पिके, अंशत: बागाईत पिके आणि ऊस, द्राक्षे, माेठमाेठी फळझाडे याला ही पद्धती पुरते. त्यातून मिळणारे पीक हे जैविक असते, हे स्वतंत्रपणे सांगणे न लगे.यातील प्रत्यक्ष शेतीची जी प्रक्रिया आहे ती माेठ्या शेतासाठीही चालणारी आहे, बागेसाठीही चालणारी आहे आणि घरातील एखाद्या कुंडीतील राेपासाठीही चालणारी आहे. यातील महत्त्वाची प्रक्रिया आहे ती ‘अमृत पाणी’ तयार करण्याची.भारतीय गाेवंशाचे म्हणजे वशिंड असलेल्या गाईचे किंवा बैलाचे ताजे दहा किलाे शेण, अर्धा किलाे मध, पाव किलाे देशी गाईचे तूप हे एकत्र करणे. त्याच वेळी वडाच्या झाडाखालची वीस किलाे माती आणणे.शेण, मध आणि तूप एकत्र करून ते शंभर लिटर पाण्यात टाकणे. नंतर त्यात ती माती टाकणे. ते ढवळून एक एकर शेतावर शिंपडणे किंवा भांड्याने देणे. ही प्रक्रिया दाेन वेळा करावी लागते. एक म्हणजे पेरणीपूर्वी करण्याची बीजप्रक्रिया किंवा बीजसंस्करण या वेळी ही प्रक्रिया करावी लागते. बियाणे साधारणत: तीन प्रकारची असतात. एक म्हणजे मटार, चवळीसारख्या कडक बिया, दुसरे म्हणजे शेंगदाणे यांच्यासारखे बियाणे की थाेडा वेळ जरी पाण्यात ठेवले तरी साल सुटण्याची शक्यता असते.तिसरी पद्धत म्हणजे भात, मिरची यांची छाेटी राेपे करून ती पुन्हा माेठ्या शेतात लावायची. आणि चाैथा प्रकार म्हणजे उसाची कांडी. उसाची कांडी आणि टणक बियाणे एक तास त्यात ठेवली तरी चालतात. साल लगेच सुटणारी बियाणे पेरणीपूर्वी थाेडा वेळ ठेवून लगेच पेरायची असतात. आणि उसाची कांड्या तीन तास अमृतपाण्यात ठेवायची असतात. ही प्रक्रिया करताना वरील अमृतपाणी एक दशांश प्रमाणात करून घ्यायचे. म्हणजे ते व्यवस्थित भिजवता येईल.प्रत्यक्ष पेरणी हाेऊन थाेडी राेपे वर दिसू लागली की, मुख्य अमृतपाणी साऱ्या शेतावर सड्यासारखे शिंपडायचे.याला जाेडून जी गाेमूत्रपाणी नावाची जी प्रक्रिया आहे, ती दर आठवड्याला करायची असते. शंभर लिटर पाण्यात एक लिटर गाेमूत्र घालून ते पंपाने पिकावर शिंपडणे. यात अमृतपाणी प्रक्रिया जमिनीतून आवश्यक ती पाेषक तत्त्वे देण्यात महत्त्वाची भूमिका बजावते, तर गाेमूत्रपाण्याने ते राेप सूर्यप्रकाशातील सामर्थ्य घेते. त्या प्रक्रियेस फोटाेसिंथेसिस किंवा प्रकाशसंश्लेषण म्हणतात.
 माेरेश्वर जाेशी, 9881717855