प्रत्येक गाय ही गाेठ्यात बांधल्यावर गाेआधारित शेतीचे सारे परिणाम देतेच; पण तीच गाय जर गाेचरभूमी म्हणजे गायरानावर चरली, तर तेच परिणाम दुप्पट प्रभावाने हाेतात.गाेआधारित शेतीचे खत घरीच केले, तर एक पैसाही खर्च येत नाही.
देशी गाईच्या चरण्यासाठी राखून ठेवलेल्या गायरानांवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी आगामी काळात उग्र आंदाेलने झाली तर आश्चर्य मानू नये.स्वातंत्र्याेत्तर काळात ही अतिक्रमणे झाली आहेत आणि त्यावर शंभर शंभर काेटी किमतीच्या इमारती, वसाहती उभ्या राहिल्या आहेत. आजपर्यंतही त्यांना गाेभक्त संघटना किंवा गाेरक्षक संघटना यांच्याकडून विराेध व्हायचा; पण त्याला काेणी दाद देत नसे.त्याच्या विराेधात आंदाेलन करण्यात आचार्य विनाेबा भावे यांची प्रेरणा हाेती. तरीही उपयाेग झाला नाही. पण, आता गाेवंशाचे अनेक उपयाेग पुढे आले आहेत. अनेक विद्यापीठे आणि गाेविज्ञान संशाेधन संस्था यांनी केलेले प्रयाेग पाहता एक बैल अथवा एक गाय यांच्या शेण आणि गाेमूत्र यांच्या आधारे रासायनिक खतापेक्षाही अधिक उत्पन्न देणारी उसाची शेती हाेणे सुरू झाले आहे.पाच वर्षांपूर्वी गाेविज्ञानाचा वापर सुरू झाला आणि ताे वेगाने वाढत आहे. हा विषय देशभर सुरू झाला, तर युरिया, रासायनिक खते आणि कीटकनाशके यांच्या आयातीेचे मिळून परदेशी चलनातील दहा लक्ष काेटी रुपये वाचणार आहेत. प्रत्येक गाय ही गाेठ्यात बांधल्यावर गाेआधारित शेतीचे सारे परिणाम देतेच; पण तीच गाय जर गाेचरभूमी म्हणजे गायरानावर चरली, तर तेच परिणाम दुप्पट प्रभावाने हाेतात. गाेआधारित शेतीचे खत घरीच केले, तर एक पैसाही खर्च येत नाही.पण, त्यासाठी रासायनिक खत आणले, तर पंचवीस ते चाळीस हजार रुपये खर्च येताे. शिवाय मिळणारे उत्पन्न हे विषारी शेतमालाची निर्मिती करणारे असते.ही जी स्थिती शेतीबाबतची आहे तीच स्थिती वैद्यक क्षेत्रातील आहे. तेथेही अतिशय नाममात्र खर्चात कॅन्सर, किडनी, डायबेटिज विकार दुरुस्त हाेऊ लागले आहेत. अशी दहा बाबींची यादी आहे. त्यामुळे केवळ धार्मिक कारणांनी नव्हेतर सामान्य माणसाच्या उपयाेगीतेच्या कसाेटीवरही गाय आवश्यक आहे आणि ती गायरानातच चरणे आवश्यक आहे.
माेरेश्वर जाेशी, 9881717855