गाेवंशाच्या पुढे गव्हाणीत येणाऱ्या वैरणीत काेणता चारा यावा, यावर गाेवंशाला निवड करायला वाव नसताे. त्यामुळे अनेक प्रकारचे राेग निर्माण हाेण्याची शक्यता असते. हे सर्व टाळायचे असेल तर गायराने ही रिकामी झाली पाहिजेत.
गायरानावर गाई नेणे हा प्रकार अलिकडे इतिहासजमा झाला आहे.याबाबतची वस्तुस्थिती अशी की, गाईला गायरानावर हिंडू दिले तर गाई दुप्पट दूध देतात. कारण त्यांना त्यांचा चांगला चारा शाेधण्याची संधी मिळते. गाईमध्ये चांगला चारा निवडण्याची माेठी क्षमता असते.त्याच प्रमाणे प्रत्येक गाय किंवा बैल हा त्यांच्या गरजेनुसार चारा ठरवत असल्याने त्यांची प्रकृती चांगली राहते. यातील जाणकारांचे मत असे आहे की, गाईला काही शारीरिक त्रास असेल तर काेणत्या चाऱ्याने ताे कमी हाेईल याचे ज्ञान गाईला असते. अर्थात त्यालाही अलिकडे मर्यादा आली आहे. गाईला आपण गाेठ्यात बंद ठेवताे. गाेवंशाच्या पुढे गव्हाणीत येणाऱ्या वैरणीत काेणता चारा यावा, यावर गाेवंशाला निवड करायला वाव नसताे.त्यामुळे अनेक प्रकारचे राेग निर्माण हाेण्याची शक्यता असते. हे सर्व टाळायचे असेल तर गायराने ही रिकामी झाली पाहिजेत. शेतीसाठी काेणत्याही संस्थेने संशाेधित केलेले द्रावण वापरले तरी एक गाेष्ट समान आहे की, दर महिन्याला दहा किलाे शेण आणि दहा लिटर गाेमूत्र यांच्या आधारे तीन महिन्यांची जी काेरडवाहू पिके असतात, त्यांची पूर्णपणे खतांची साेय हाेते. माेठे उत्पादन देणारी उसासारखी पिके, द्राक्षांच्या बागा किंवा आंबा, काजू अशी फळे यांना सरासरी दर महिन्याला ताे द्रावणाचा हप्ता द्यावा लागताे. त्याखेरीज प्रत्येकाची मध, तूप, गूळ, डाळीचे पीठ, ताक, वडाच्या झाडाखालची माती याबाबतच्या सूचना असतात हे निराळे. त्याचप्रमाणे याला जाेडून अनेक काढेही सुचवले जातात.त्याचा अनेकपटींना उपयाेग हाेताे; पण त्या साऱ्याचा मुख्य गाभा म्हणजे दहा किलाे शेण आणि दहा लिटर गाेमूत्र.याचा अर्थ असा की, एक गाय किंवा बैल हे दरराेज जेवढे शेण आणि गाेमूत्र देतील ते फार महत्त्वाचे आहे. या साऱ्या हिशाेबानुसार एक गाय किंवा बैल यांच्या आधारे तीस एकराची माेठ्या उत्पन्नाचीही शेती हाेते. अर्थात असे प्रयाेग प्रत्यक्षात पाहिल्याखेरीज किंवा प्रत्यक्ष केल्याखेरीज विश्वास बसणार नाही. याआधारे गावातील गायराने किती महत्वाची आहेत, हे लक्षात येईल.त्यामुळे गायराने मुक्तीच्या चळवळीला महत्व आहे.
माेरेश्वर जाेशी, 9881717855