अनुभवी गाेशाळा संचालकांनी नेहमी आपल्या भागातील गाेवंशाला प्राधान्य द्यावे. त्यांचे शेण आणि गाेमूत्र शेतीसाठी अधिक प्रभावी असते. दूध न देणारी स्थानिक गाय ही गाेआधारित शेतीसाठी अधिक चांगली.
देशी गाय पाळणे हा जीवनाचा महाेत्सवही असताे आणि संतांचा अभंगही असताे. असे असले तरी प्रत्यक्षात आर्थिक विचार करावा लागताेच. अनेक साधक आध्यात्मिक अनुष्ठानासाठी गाय पाळतात, ती बाब निराळी. पण, व्यवहारी जगात काही गाेष्टीची काळजी घ्यावी लागते.गीर गाय आपल्या गाेठ्यात असावी, असे अनेकांचे स्वप्न असते; पण गीर गाेवंशाचा आहार अन्य त्याच आकाराच्या गाेवंशाच्या दुप्पट असताे.गाईला विशेष रसायनाच्या गाेळ्या किंवा इंजेक्शने देऊन वीस-तीस लिटर दूध देणे भाग पाडणे, यात त्या गाईची प्रकृती खराब हाेत असते. दहा लिटर दूध देणारी गाय चाळीस किलाे चारा खात असते.अशी गाय दाेन तीन वेतेच टिकते. ज्या विदेशी गाई भरपूर दूध देतात त्यांचीही जादा वेते हाेत नाहीत. आपल्या गावरान गाई पंधरा साेळा वेते देतात. त्या गाई फार चारा खात नाहीत. गाेआधारित शेतीच्या दृष्टीने विचार केला, तर त्या गाई अनेक पटींनी उपयाेगी पडत असतात. अनुभवी गाेशाळा संचालकांनी नेहमी आपल्या भागातील गाेवंशाला प्राधान्य द्यावे. त्यांचे शेण आणि गाेमूत्र शेतीसाठी अधिक प्रभावी असते. दूध न देणारी स्थानिक गाय ही गाेआधारित शेतीसाठी अधिक चांगली.गेली साेळा वर्षे गीर गाईंची गाेशाळा सांभाळणारे बन्सी गाेशाळेचे गाेपालभाई सुतारिया यांचे म्हणणे असे की, गुजरातमध्ये गीर गाईची दुधाची फॅट चांगली मिळते, म्हणजे अन्यत्र चांगली मिळेलच असे नाही. त्या तुलनेत तर जर्सी, क्राॅसब्रीड यांची फॅट अजून कमी असते. त्यामुळे त्यांचे दूध अधिक असले तरी ती फायद्याची नाही.गीर गाय गुजराथेत आदर्शही असते.त्याच प्रमाणे मालवी, डांगी, साहिवाल, हरियान्वी, बद्री मेवासी, थारपारकर, कांकरेज, केरळमधील अतिशय लहान आणि बुटकी असलेली वेचुरी या साऱ्या गाई त्या त्या भागात अतिशय यशस्वी असतात. कृष्णाकाठच्या खिलार, हळ्ळीकर या कमी दूध देणाऱ्या असूनही त्या गाईही आणि ते बैलही शेतीसाठी प्रभावी असतात.
माेरेश्वर जाेशी, 9881717855