दल्ली आयआयटीच्या मुलांना संशाेधनासाठी देण्यात आले. त्यांनी गाईच्या शेणाच्या पाेकळ गाेवऱ्या केल्या. पाेकळ म्हणजे नळीसारख्या.त्याच्या सरपणातून गॅसपेक्षाही कमी प्रदूषण हाेते.
या साऱ्या बाबी आपल्याकडे घराेघरी माहीतही असतात. पण, आजपर्यंत माहीत नसलेले विषय म्हणजे गाै-सरपण आणि सार्वजनिक स्वच्छता. पाच वर्षांपूर्वी यातील कांही विषय दिल्ली आयआयटीच्या मुलांना संशाेधनासाठी देण्यात आले. त्यांनी गाईच्या शेणाच्या पाेकळ गाेवऱ्या केल्या. पाेकळ म्हणजे नळीसारख्या. त्याच्या सरपणातून गॅसपेक्षाही कमी प्रदूषण हाेते.अर्थात हा विषय अजून संशाेधन स्थितीत आहे; पण सकृतदर्शनी बहुमजली इमारतीच्या वरील मजल्यावरील स्वयंपाकगृहातही हे सरपण वापरणे चालू शकते. गॅसपेक्षा कमी प्रदूषण हाेते, हा त्यातील महत्त्वाचा भाग, ते सुरक्षितपणे वापरणे हा काैशल्याचा विषय आहे, त्याच्या काही पद्धती बसवाव्या लागतील. यातील पुढचा भाग म्हणजे एखादे घर असाे, गाव असाे की शहर असाे. सांडपाण्याच्या विषयाने अक्राळविक्राळ रूप धारण केले आहे.काेणतेही शहर म्हणून पुण्याचेच उदाहरण द्यायचे झाले, तर पुणे शहर दर महिन्याला दाेन टीएमसी-(एक टीएमसी : एक अब्ज घनूट) पाणी वापरत असते. त्याच प्रमाणे जिल्ह्यात महिन्यात पंधरा टीएमसी पाणी वापरले जाते. हे सारे पाणी सांडपाण्याच्या माध्यमातून उजनी धरणात जाते. उजनीची क्षमता सव्वाशे टीएमसीची आहे. आपल्याकडे सांडपाण्यातून आपल्या भागात राेगराई तर वाढतेच; पण उजनीतून पुढे जाणाऱ्या पाण्यामुळे साेलापूर जिल्ह्यात राेगराई पसरते.पुणे हे फक्त उदाहरण आहे. जगातील प्रत्येक गाव प्रत्येक शहर येथे हीच आकडेवारी त्या त्या प्रमाणात असते. पण, घराभाेवतीच्या घाणीच्या ढिगावर किंवा महापालिकेच्या मैलापाणी शुद्धिकेंद्रातही शेण आणि गाेमूत्र यांच्या आधारे केलेले अमृतपाणी किंवा जिवामृत वापरले, तर ते पाणी पूर्णपणे शुद्ध स्वरूपात मिळते.मैलापाणी शुद्धिकरण केंद्रातील खर्चापेक्षा हा खर्च फारच कमी असताे.
माेरेश्वर जाेशी, 9881717855