गाेविज्ञानातील प्रत्येक प्रयाेगाचे स्वतंत्र महत्त्व

    14-Mar-2021   
Total Views |
शंभर देशी गाई घेतल्या तर सर्वच गाईंच्या शेणात सारखे जीवाणू नसतात. प्रत्येक गाईची स्वतंत्र स्वतंत्र जीवाणू तयार करण्याची क्षमता माेठी असते. चारशे गाईतून त्यांना एकूण चाळीस जीवाणू सापडले आहेत. हे सारे जीवाणू मानवी जीवनाला अतिशय उपयाेगी असतात.
 
c_1  H x W: 0 x
गाेवंशाचे शेण शेतीला किती उपयाेगी असते, हे आता गाेआधारित शेती करणारांना माहिती आहे. ते शेण किंवा शेण आणि गाेमूत्र यांच्या आधारे अमृतपाणी, जीवामृत अशी निरनिराळी खते तयार केली जातात व एक एकराला अवघ्या पाच दहा किलाे शेण आणि पाच दहा किलाे गाेमूत्र यांच्या सहाय्याने तयार केलेले शंभर पाणी पुरते. पुणेयेथील गाेविज्ञान संशाेधन संस्थेचा अनुभव असा की, दहा किलाे शेणात पाव लीटर तूप आणि अर्धा लीटर मध घालून ते रसायन शंभर लीटर पाण्यात मिसळावे ते एका एकराला पुरते. त्याच प्रमाणे शंभर लीटर पाण्यात एक ते दाेन लीटर गाेमूत्र घालून ते दर आठवड्याला एका एकरावर फवारावे. अशा प्रकारची शेती आज महाराष्ट्रात पाच लाख एकरावर सुरू आहे. ही पद्धत हाताशी असलेल्या घटकांच्या आधारे त्वरीत करता येते.पण आज भारतात अनेक ठिकाणी अनेक प्रयाेग सुरू आहेत. त्याना यशही मिळत आहे. यातील एक गाेष्ट लक्षात घ्यावी की, एका ठिकाणी फक्त एका पद्धतीचाच वापर करावा. असे एकूण दहा पंधरा प्रकार देशातील निरनिराळी कृषिविद्यापीठे, गाेविज्ञान संशाेधन संस्था, नामांकित संस्था आणि नामांकित व्यक्ती यांनी तयार केली आहेत.गेल्या चार वर्षात गाेविज्ञानाचा अभ्यासक पत्रकार या नात्याने मी अशा गाेविज्ञानाच्या प्रयाेगावर पंधराशेहून अधिक लेख लिहिले आहेत. शंभराहून अधिक संशाेधकांचे अनुभव त्यात मानले आहेत. काेणता अनुभव काेठे उपयाेगी पडेल, हे सांगता येत नाही. तरीही दहा गुंठ्यावर केलेला अनुभव कधी वाया जात नाही. ताे काही तरी शिकवूनच जाताे.श्री सुतारिया यांचे अनुभव तेवढेच लक्षणीय आहेत. त्यांचे म्हणणे असे की, ओळीने शंभर देशी गाई घेतल्या तर सर्वच गाईंच्या शेणात सारखे जीवाणू नसतात. प्रत्येक गाईची स्वतंत्र स्वतंत्र जीवाणू तयार करण्याची क्षमता माेठी असते. चारशे गाईतून त्यांना एकूण चाळीस जीवाणू सापडले आहेत. हे सारे जीवाणू मानवी जीवनाला अतिशय उपयाेगी असतात.
 माेरेश्वर जाेशी, 9881717855