शेतीला जसे खत आवश्यक असते, त्याचप्रमाणे दर आठवड्याला गाेकृपाअमृतम्चा फवाराही आवश्यक असताे. त्यातील बारकाव्यासाठी बन्सी गाेशाळा या वेबसाईटवरील अनेक व्हिडीओ क्लिपा आहेत, त्या बघाव्यात
गाेकृपामृतम्वर केवळ पावसावर येणारी पिके आणि माेठ्या उत्पन्नाची बागाईत पिकेही चांगली येतात. अलिकडे रासायनिक खताच्या माध्यमातून शेतकऱ्यांना माेठ्या गुंतवणुकीची माेठी पिके घेण्याची सवय लागली आहे. ती त्यांनी जरूर घ्यावी. आमची त्यांना विनंती अशी की, तुमच्याकडे जर दहा एकर जमीन असेल तर त्यातील अर्धा एकर जमीन अशा प्रयाेगासाठी राखून ठेवावी. अवघ्या दहा दहा गुंठ्यातही गाेआधारित शेतीचे दाेन प्रयाेग करता येतील. त्याची प्रचीती घ्यावी आणि नंतर ती दहा एकरावर वापरावी.आज या गाेकृपाअमृतम् द्रावणावर काही लाख एकर शेती सुरू आहे. पण ते घेत आहेत म्हणून नवीन व्यक्तीनेही ती घ्यावी असा सल्ला मी देणार नाही.त्याचा अनुभव घ्यावा आणि मग त्याचा माेठया प्रमाणावर वापर करावा. हे सारे करत असताना शेतकरी अभ्यासकांनीही एक गाेष्ट लक्षात घ्यावी की, गाईचे दूध हे शरीराला उपकारक तर असतेच त्याच प्रमाणे ते बुद्धिवर्धकही असते. तीच स्थिती गाेआधारित शेतीची आहे. यावर येणारे पीक हे बुद्धिवर्धकही असते.शेतीला जसे वर उल्लेखिलेले खत आवश्यक असते, त्याच प्रमाणे दर आठवड्याला गाेकृपाअमृतम् चा फवाराही आवश्यक असताे. त्यात त्या दाेनशे लीटर द्रावणातील दाेन लीटर द्रावण हे एक लीटर गाेमूत्र आणि एक लीटर पन्नास दिवसाचे शिळे ताक यात मिसळावे. ते तीन लीटर द्रावण आणि बारा लीटर पाणि हे पंधरा लीटरच्या फवारणी टाकीत साेडावे व त्याची फवारणी करावी. ते ताक जर तांब्याच्या भांड्यात ठेवलेले असेल तर त्याचा प्रभाव अधिक हाेताे. त्याच प्रमाणे आपल्या शेतीत कधी कधी अशी काही कीड असते की, ती हटता हटत नाही. अशावेळी त्या ताकात तांब्याच्या तुकडयांचे प्रमाण एक किलाेपर्यंत वाढवावे. आपल्याकडे एक लीटर गाेकृपाअमृतमचा दाेनशे लीटरचा ड्रम तयार झाला असेल, त्यातील जसे जसे तुम्ही वापराल, त्या प्रमाणात त्यात गुळ आणि ताक घालून ते वाढवावे.त्यातील अजून काही बारकाव्यासाठी बन्सी गाेशाळा या वेबसाईटवरील अनेक व्हिडीओ क्लिपा आहेत, त्या बघाव्यात.
माेरेश्वर जाेशी, 9881717855