आपल्या शेताला आणि त्यातील पिकाला ते खत किती लागते, हे शेतकऱ्याला चांगले कळते. ते शेत आणि ते पीकच शेतकऱ्यांशी बाेलत असते.
देशातील अधिकाधिक शेतकऱ्यांना गाेविज्ञानाच्या प्रयाेगात सहभागी करून घेण्याचे उद्दिष्ट असणाऱ्या बंसी गीर गाेशाळेचे गाेकृपाअमृतम् हे द्रावण त्यांच्या केंद्रावर जाअून घ्यावे लागते. त्याची सर्व माहिती त्यांच्या वेबसाईटस्वर आहे.देशातील बहुतेक राज्यात त्यांची केंद्रे आहेत. तेथे जाऊन ते घ्यावे लागते. ती विनामूल्य मिळते. प्रत्येक शेतकऱ्याने ते वापरावे आणि त्यावर अधिकाधिक प्रयाेग करावे, अशी त्यांची अपेक्षा असते. त्या एक लीटरच्या आधारे आपल्याकडेच दाेनशे लीटरचा साठा करण्याची एक पद्धतीही त्यांनी दिली आहे. त्या द्रावणाची आवश्यक ती काळजी घेतली तर ते गाेकृपामृत कायम स्वरूपात टिकते. ते साधारणपणे एक वर्षभर टिकणे हे सामान्य शेतकऱ्यालाही थाेड्या काळजीने टिकवता येते पण दीर्घकाळ प्रयाेग आणि वापर करण्यासाठी सखाेल माहिती घ्यावी लागते.त्याचे थाेडक्यात वर्णन देत आहे. दाेनशे लीटर पाण्यात ते एक लीटर जीवाणूचे रसायन एक लीटर एक महिना शिळे ताक आणि एक किलाे गुळ यांच्यासह मिसळावे. त्या ड्रमला सुतीकापडाचा अभ्रा बांधून ते झाडाखाली सावलीत ठेवावे.पाच दिवसांनी ताे संपूणं ड्रम हाच मुळी त्या जीवाणूमय झालेला असेल.याचा वापर दाेन पद्धतीने केला जाताे.एक म्हणजे त्या दाेनशे लिटर द्रावणापैकी फक्त दाेन लीटर द्रावण घेऊन एक टन शेणाचे कंपाेस्ट खत तयार करणे. दाेन फुट रुंद आणि दाेन फुट उंच अशा आकाराचा आणि एक टन शेण बसू शकेल, अशा लांबीचा एक पट्टा तयार करावा. ते न सुकण्याएवढे त्यावर पाणी फवारावे.त्यातून फक्त पन्नास दिवसात कंपाेस्ट खत तयार हाेते. आपल्या शेताला आणि त्यातील पिकाला ते खत किती लागते, हे शेतकऱ्याला चांगले कळते. ते शेत आणि ते पीकच शेतकऱ्यांशी बाेलत असते.पण एक गाेष्ट खरी की, त्याचे उत्पादन चांगलेही येते आणि स्वादिष्ट हाेते. अगदी उदाहरणच द्यायचे झाले तर साधे वांगेही काेणत्याही अन्य स्वादिष्ट फळापेक्षा गाेड आणि मधुर लागते.
माेरेश्वर जाेशी, 9881717855