अहमदाबादच्या बन्सी गाेशाळेचे महत्त्वाचे संशाेधन

    11-Mar-2021   
Total Views |
बन्सी गाेशाळेच्या संशाेधक गटाची अशी खात्री झाली आहे की, या मित्रजीवाणूमुळे जमिनीत पडणाऱ्या पाण्यापैकीच ऐंशी टक्के पाणी वाचते. ते पाणी त्याच जमिनीत मुरून जमिनीखालील पाण्याची पातळी वाढते.त्याला गाेकृपामृत जीवाणू असे नाव दिले आहे.
 
व._1  H x W: 0
 
गुजरातेतील बन्सी गीर गाेशाळेचे श्री गाेपाळजी सुतरिया यांना गाईच्या शेणातून आणि गाेमूत्रातून जे जीवाणू सापडले आहेत त्यातून त्यांनी गाेकृपामृत नावाचे एक द्रावण तयार केले आहे. त्यामुळे गाेआधारित शेती क्षेत्रात क्रांती हाेण्याची शक्यता आहे.हा जीवाणू सर्व देशी गाईंच्या शेणात नसताे.त्यांनी साडेचारशे गाईंपैकी प्रत्येक गाईचे शेण आणि गाेमूत्र यांचे स्वतंत्र संशाेधन केले. त्यात त्यांना अनेक नवे जीवाणू मिळाले. त्यांना मिळालेल्या चाळीस बॅक्टेरियापैकी काहींमध्ये हवेतील नायट्राेजन घेऊन ताे झाडाला किंवा राेपाला सुपाच्या स्वरूपात देण्याची क्षमता असते. त्यातील चार बॅक्टेरिया हे कीडनियंत्रक आहेत. सहा बॅक्टेरिया हे कंपाेस्टखत प्रक्रियेला गती देणारे आहेत. त्यात सापडलेले लॅक्टाेबॅटालिसिस हा बॅक्टेरिया त्या वनस्पतीची पचनशक्ती वाढविताे. त्याचप्रमाणे जीओ बॅक्टर हा जमिनीतील वनस्पतीला उपयाेगी पडणारी खनिजे बाहेर काढून वनस्पतीला सुपाच्या स्वरूपात देताे. बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू. यात विषारी जीवाणूही असतात आणि वनस्पती विश्वाला प्रचंड सामर्थ्य देणारे जीवाणूही असतात. त्यांना आपण मित्रजीवाणू म्हणताे.यात अजून संशाेधनाला प्रचंड वाव आहे.यातील मित्रजीवाणूंच्या मदतीने बन्सी गीर गाेशाळेच्या वतीने शेतीत अधिक पीक आणि चांगले पीक देणारे मित्रजीवाणूंचे द्रावण तयार केले आहे. या द्रावणाचा सर्वांत माेठा उपयाेग म्हणजे त्या शेतात पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब त्याच शेतात मुरवण्याची क्षमता त्यात आहे.येणाऱ्या काळात जगात पाणी ही माेठी समस्या असणार आहे.बन्सी गाेशाळेच्या संशाेधक गटाची अशी खात्री झाली आहे की, या मित्रजीवाणूमुळे जमिनीत पडणाऱ्या पाण्यापैकीच ऐंशी टक्के पाणी वाचते. ते पाणी त्याच जमिनीत मुरून जमिनीखालील पाण्याची पातळी वाढते. त्याला गाेकृपामृत जीवाणू असे नाव दिले आहे.साडेचारशे गाेवंशाचे शेण आणि गाेमूत्र यांचे स्वतंत्र संशाेधन केल्यामुळे त्यावरील त्यांचे व्यापक संशाेधन अजूनही सुरू आहे. त्या गाेकृपामृताच्या एक एक लिटरच्या बाटल्या तयार करून माेठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना वाटल्या. त्या पद्धतीने ते त्याचे अजूनही शेतकऱ्याना विनामूल्य वितरण करत आहेत.
 माेरेश्वर जाेशी, 9881717855