गाेमूत्र आणि शेण यामुळे प्रचंड फायदा हाेणारी दहा क्षेत्र

    01-Mar-2021   
Total Views |
रासायनिक शेतीचे आव्हान अनेक आघाड्यांवर असते. एक म्हणजे शेतीचा कस जाताे. दुसरे म्हणजे ते शेती उत्पादन आहारात आल्यावर ती व्यक्ती राेगांना आमंत्रण देते.
 
dw_1  H x W: 0
 
दूध न देणाऱ्या गाईची काळजी करायचे कारण असे की, ती गाय कायम रस्त्यावरच साेडून दिली जाते. ती गाय डाेईजड मानली जाते. वस्तुस्थिती अशी आहे की, दूध न देणारी ही गाय अनेक पटींनी उपयाेगी असते. माेठ्या चणीच्या गाई म्हणजे ताे गाेवंश उदाहरणार्थ -गीर, थारपारकर, ओंगाेले, कांकरेज, साहिवाल या दरराेज पंधरा किलाे शेण आणि दहा लिटर गाेमूत्र देत असतात, तर कृष्णाकाठच्या खिलार, हळ्ळीकर या गाई दहा किलाे शेण आणि सात लिटर गाेमूत्र देतात.हे आकडे सरासरीचे आहेत. गाेमूत्राचा सर्वांत अधिक उपयाेग हा वैद्यकासाठी हाेताे. पण, ताे तज्ज्ञानी हाताळण्याचा विषय आहे. तज्ज्ञांच्या मदतीने अभ्यास करून औषधे तयार करता येतात.पण, यातील मुख्य मुद्दा आहे ताे शेती, स्वच्छता, सरपण यांचा व्यवसाय म्हणून उपयाेग करण्याचा. शेतीत अवघ्या दहा किलाे शेणाच्या आणि तेवढ्याच गाेमूत्राच्या आधारे एक एकर शेती हाेते.यावर यापूर्वी अनेक वेळा लेख दिले आहेत. त्याच्या आधारे रासायनिक खताच्या आधारे हाेणाऱ्या नव्वद टक्के शेतीचे आव्हान पेलले जाते.रासायनिक शेतीचे आव्हान अनेक आघाड्यांवर असते. एक म्हणजे शेतीचा कस जाताे. दुसरे म्हणजे ते शेती उत्पादन आहारात आल्यावर ती व्यक्ती राेगांना आमंत्रण देते. आज प्रत्येक घरी अन्नखर्चापेक्षा औषध खर्च अधिक आहे, याचे एकमेव कारण आहारात येणारी रासायनिक खतावर आलेली कृषिउत्पादने. यातील आजपर्यंत न माेजली गेलेली समस्या म्हणजे आयात कराव्या लागणाऱ्या रासायनिक खतांच्या किमतीच्या तुलनेत त्यावर आलेले अन्न खाल्ल्याने हाेणारे आजार निस्तरण्यासाठी तीन ते चारपट किमतीची औषधे आयात करावी लागतात. हा सारा विदेशी चलनावर ताण पडत असताे. गाेमूत्र आणि शेण याच्या आधारे म्हणजे गाेआधारित शेती केली, तर त्यातून मार्ग निघताे.
रासायनिक खतांमुळे शेती खराब हाेणे, त्यावरील अन्नामुळे शरीर प्रकृती खराब हाेणे याबाबी माेजता येतात; पण माणसाच्या क्षमतेची जी हानी हाेते, ती माेजताही येत नाही. पण, गाेआधारित शेती आणि त्यासाठी घरात एक गाय ठेवणे यामुळे शरीर तर सुधारतेच; पण त्याच बराेबर घरात चांगले वातावरण मिळते. मुलांचाही अभ्यास चांगला हाेताे.घरात सुसंस्कार जाणवतात.
 माेरेश्वर जाेशी, 9881717855