दक्षिण ध्रुवावर गाय

    09-Feb-2021   
Total Views |
एका गाईमुळे दक्षिण ध्रुवावरील माेठ्या प्रदेशाला छाेटी अमेरिका अशी संज्ञा मिळाली. अमेरिकेच्या विस्तारातील ती एक माेठी घटना मानली जाते.
 
जगातील विस्तारवादाचे समर्थन करायचे की विराेध करायचा, हा व्यापक मुद्दा आहे, पण 87 वर्षापूर्वी अमेरिकेतील गाय दक्षिण ध्रुवापर्यंत कशी गेली, याची कथा लक्षवेधी आहे.जगातील नवे नवे प्रदेश पादाक्रांत करायला युराेपातील लाेकांनी चाैदाव्या शतकापासूनच आरंभ केला हाेता.अमेरिकेतून अन्य देशांत जाणे हे एकाेणिसाव्या शतकात सुरू झाले.अमेरिकेतील एक अ‍ॅडमिरल रिचर्ड ई ब्रायर्ड याने इ.सन 1933 मध्ये दक्षिण ध्रुवावर जाऊन काही वर्षे मुक्काम करण्याचे ठरविले. असे मुक्काम केले की, त्या त्या प्रदेशावर हक्क सांगता येताे, असा ह्युजेस डाॅक्ट्रीन त्या काळी प्रचलित हाेता. त्याकाळी अनेक देशांनी तसे प्रयत्न केलेही हाेते. त्यासाठी अ‍ॅडमिरल ब्रायर्ड याने दक्षिण ध्रुवावरील एक माेहीम म्हणजे एक्सपिडिशन केलीही हाेती. ती त्याला पुरेशी वाटली नाही. म्हणून तेथे जनजीवन, लाेकजीवन स्थापन करण्याचा प्रयत्न त्याने दुसऱ्या माेहिमेत करायचे ठरविले.ही माेहीम खाजगी हाेती आणि विल्यम हाॅर्लिक्स यांनी त्याचा खर्च उचलण्याचे ठरविले. हे हाॅर्लिक्स म्हणजे ज्यांच्या नावाने पेय उपलब्ध आहे, ते. त्यानी त्या माेहिमेसाठी तीन गाई घेतल्या.त्यातील एक गाय गाभण हाेती. गाभण गाय बराेबर घेण्याची त्यांची कल्पना अधिक उपयाेगी ठरली. कारण तीनही गाईंची प्रकृती त्या थंडीत वारंवार बिघडत असे, पण त्याच वातावरणात जन्मलेले वासरू त्या र्बाळ प्रदेशात बागडत असे. त्याचे नावही आईस बर्ग म्हणजे हिमनग असेच ठेवण्यात आले.त्या दाेन वर्षांतील अँटार्टिकावरील मुक्कामात त्यांना अनेक प्रयाेग करता आले. ती माेहीम संपवून त्यांची टीम जेव्हा परत आली तेव्हा त्यांचे माेठे स्वागत करण्यात आले. त्याच्या आधी आणि नंतर पाच पाच वर्षांच्या काळात जगातील अनेक देशांच्या दक्षिण ध्रुवावर माेहिमा झाल्या. अनेकांनी आपले ध्वज तेथे लावले, पण ध्वज लावणाऱ्यांची संख्या माेठी असल्याने अन्य पुरावे गाेळा करणे सुरू झाले तेव्हा तेथे ज्यांनी गाय आणि इतर प्राण्यांसह जनजीवन प्रस्थापित केले, त्यांचाच दावा हा खरा ठरला आणि अँटार्टिका छाेटी अमेरिका म्हटली जाऊ लागली. असे प्रयाेग युराेप आणि अमेरिकेतील देशांनी त्या काळात माेठ्या प्रमाणावर केले, याचे मुख्य कारण म्हणजे पंधराव्या शतकापासून त्या प्रत्येक देशाचे जगातील अन्य देशांत व्यापार सुरू हाेते, त्याच्या आधारे तेथील सत्ता मिळवणेही सुरू झाले हाेते.भारतीयांनी हा विषय अधिक गांभीर्याने घेण्याची गरज आहे. कारण जगातील प्रत्येक भाषेत संस्कृतचे दाेन हजार शब्द आहेत.
 माेरेश्वर जाेशी, 9881717855