भारतीय उपखंडात जेथे जेथे बाैद्धधर्म आहे, तेथे गाेविज्ञान संस्कृती बऱ्याच अंशी टिकून आहे. त्या साऱ्यांचा ओढा हा भारताकडे असताे. पाच वर्षांपूर्वीपर्यंत भारतात त्यांची बाजू ऐकून घेणारेही काेणी नव्हते.
आज आता स्थिती तशी राहिलेली नाही. श्रीलंकेत पाचशे वर्षांचा गायींवरील अत्याचार आणि गेल्या पन्नास वर्षातील तामिळी-सिंहली यादवीच्या काळातही तेथे सुरू असलेले गाेहत्याबंदीचे आंदाेलन पाहिले असता भारत आणि श्रीलंका येथील या विषयातील स्थिती सारखीच आहे.श्रीलंकेत तीव्र आंदाेलनानंतर गाेहत्याबंदीचा कायदा झाला म्हणून आपण त्यावर लेखन केले; पण ब्रह्मदेश, चीन, नेपाळ, उत्तर काेरिया, दक्षिण काेरिया, जपान, तैवान, इंडाेनेशिया, मलेशिया, व्हिएतनाम, कंबाेडिया, लाओस, थायलंड याच बराेबर पाकिस्तान आणि बांगला देशही गाेविज्ञानाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे देश आहेत. या बारा देशात काेठेही गाेहत्याबंदी नाही; पण यातील दहा देशात गाेहत्याबंदीच्या छाेट्या छाेट्या चळवळी सुरू आहेत. गाईंच्या अतिशय महत्त्वाच्या जाती तेथे आहेत.गाेविज्ञानाच्या समृद्ध परंपरा आहेत.बालीबेटावर सुग्रीव विद्यापीठ आहे, त्यात गाेविज्ञानाच्या अभ्यासाचा विभाग आहे. बालीबेटावरच फक्त दहाच पांढऱ्या शुभ्र रंगाच्या गायी असलेले एक गाव आहे. तेथे मलेशिया, इंडाेनेशिया या मुस्लिम देशातील लाेकही गाेपूजेसाठी जातात. तेथील ताराे या गावातील गाय ही नंदिनी मानली जाते. बैल हा शंकराचे वाहन नंदी मानला जाताे.या बारा देशांतील समान भाग म्हणजे एकेकाळी हे सारे गाेपूजक देश हाेते.आज प्रत्येक ठिकाणी गाेपूजनाच्या समृद्ध परंपरा आहेत. दुसऱ्या बाजूला बहुतेक देशांत गाेमांसाचा व्यापारही माेठ्या प्रमाणावर चालताे; पण यात गाेहत्येलाच वाहिलेले दाेन देश आहेत. ते म्हणजे पाकिस्तान आणि बांगला देश.गाेविज्ञानाचा अभ्यास करताना या दाेन देशांची गांभीर्याने दखल घ्यावी लागते. पाकिस्तानाबाबत तर अशी वस्तुस्थिती आहे की, भारतातील महत्त्वाचे गाेवंश हे पाकिस्तानात आहेत.जे भारतात बघायलाही मिळत नाहीत, असे भगनुरीसारखे गाेवंश पाकिस्तानात आहेत. भारतीय गाेवंशाची वाढ ही माेठ्या प्रमाणावर झाल्याने सिंधू नदीच्या खाेऱ्यात अजूनही ते वंश माेठ्या प्रमाणावर आहेत. थारपारकर, गिर, साहिवाल यांच्या अनेक उपजाती तेथे आहेत. येणारा काळ असा असणार आहे की, भारताने जरा ठाम भूमिका घेतली, तरी तेथील भारतीय गाेवंशाचे संरक्षण आपाेआप हाेणार आहे.
माेरेश्वर जाेशी, 9881717855