श्रीलंकेतील आयुर्वेदातील अनेक ग्रंथ भारतात परिचित आहेत.ते संस्कृतमध्ये आहेत. त्यातील लक्षवेधी बाब म्हणजे तेथील अनेक ग्रंथ हे रावणाच्या नावाने आहेत. आयुर्वेदातील रावण हाच रामायणातील रावण असा काेठेही उल्लेख नाही.
गाेविज्ञानाचे प्रामुख्याने तीन भाग पडतात. त्यात घरात गाय पाळण्याची संस्कृती, दुसरा भाग म्हणजे गाेआधारित शेती, गाेवैद्यक आणि तशाच स्वरूपाचे आर्थिक क्षेत्रातील उपयाेग, तिसरे एक धर्मशास्त्र म्हणून व्यापक क्षेत्र आहे.श्रीलंकेच्या गाेविज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी या तीनही बाबी विचारात घ्याव्या लागणार आहेत. बाैद्धधर्मात गायीला महत्त्वाचे स्थान आहे. तेथील या विषयावरील ग्रंथ पालीत आहेत. त्यामुळे ताे व्यापक विषय ठरण्याची शक्यता आहे.श्रीलंकेतील आयुर्वेदातील अनेक ग्रंथ भारतात परिचित आहेत. ते संस्कृतमध्ये आहेत. त्यातील लक्षवेधी बाब म्हणजे तेथील अनेक ग्रंथ हे रावणाच्या नावाने आहेत. आयुर्वेदातील रावण हाच रामायणातील रावण असा काेठेही उल्लेख नाही. त्याच प्रमाणे ते निरनिराळ्या काळातील आहेत, त्यामुळे तेथे रावण स्कूल ऑफ आयुर्वेद असल्याची शंका आहे. या ग्रंथाबाबत अजून एक समस्या आहे, ती म्हणजे बहुतेक ग्रंथ हे फाटलेल्या स्थितीत आहेत.काहींची पहिली आणि शेवटची प्रकरणेच गायब आहेत. पाचशे वर्षे तेथेही परचक्र हाेते. त्यामुळे तेथील राष्ट्रीय विद्यांना बहिष्कृत केले हाेते. भारतात जसा ब्रिटिशांनी ‘काऊ स्लाॅटर लाॅ’ आणला हाेता, तसाच ताे श्रीलंकेतही आणला हाेता. फक्त ते वर्ष निराळे हाेते. ताे कायदा सन 1893 मधील आहे. भारतात पाेर्तुगीज आल्यानंतर काही वर्षात त्यांनी श्रीलंकेतही मुक्काम हलवला हाेता. तेथे त्यांचे दीडशे वर्षांचे राज्य हाेते. नंतर ते ब्रिटिशांनी घेतले. तेथेही क्लाईव्ह, कर्झन, मेकाॅले अशा अधिकाऱ्यांच्या सारखे तेथील स्थानिक लाेकांची सत्ता नाहीशी करणारे आणि तेथील संस्कृती नाहीशी करणारे अधिकारी हाेते.भारतीय आयुर्वेदात ‘रावणकृत दूतनाडी’ असा एक ग्रंथ प्रचलित आहे.पण, त्या ग्रंथाचे पहिले कांही अध्याय आणि शेवटचे काही अध्याय उपलब्ध नाहीत. रुग्णाच्या प्रकृतीबाबतचा निराेप घेऊन आलेल्याची नाडी म्हणून त्याच्या दूताची नाडी बघून व्याधी निदान करणे याला दूतनाडी म्हणतात. गेल्या पिढीतील एक थाेर वैद्य अशाेकराव भट यांनी त्याचा माेठा व्यासंग केला हाेता. त्याच्या आधारे आज पुण्यात किमान पंचवीस वैद्य या विषयात पारंगत आहेत. या विषयावर ‘नाडी तरंगिणी’ नावाचे एक संगणकीय उपकरणही तयार झाले आहे. हे सारे विषय गाेविज्ञानाशी जवळून संबंधित आहेत.
माेरेश्वर जाेशी, 9881717855