संस्कृती रक्षणासाठी बाैद्ध भिक्कूंचे आत्मदहन

    06-Feb-2021   
Total Views |
श्रीलंकेतही अनेक क्षेत्रांत भारतासारखीच स्थिती आहे.प्रथमच राष्ट्रवादी पक्षाचे दाेन तृतीयांश बहुमत झाल्यावर पहिला कायदा हा गाेहत्याबंदीचा येताे, ही बाब फार बाेलकी आहे.
 
दे._1  H x W: 0
 
सप्टेंबर 2020 मध्ये श्रीलंकेत गाेहत्याबंदी कायदा मान्य झाला, ही साधीसुधी गाेष्ट नाही. कारण सध्याचे सरकार दाेन तृतीयांश बहुमताने निवडून आल्यावर त्यांनी पहिला कायदा केला ताे म्हणजे गाेहत्याबंदीचा. ताे पंतप्रधान महेंद्र राजपक्षे यांनी मांडला आणि त्याच दिवशी ताे संमत झाला. तेथे स्वातंत्र्य मिळाल्यापासून गाेहत्याबंदीची मागणी सुरू हाेती. तेथील सरकारांनाही बहुमतासाठी अल्पसंख्य समाजाच्या लाेकप्रतिनिधीवर अवलंबून राहावे लागे.श्रीलंकेतही अनेक क्षेत्रांत भारतासारखीच स्थिती आहे. प्रथमच राष्ट्रवादी पक्षाचे दाेन तृतीयांश बहुमत झाल्यावर पहिला कायदा हा गाेहत्याबंदीचा येताे, ही बाब फार बाेलकी आहे. सत्तर टक्के बाैद्धधर्मीय असले, तरी संस्कृतचा अभिमान आणि सांस्कृतिक शास्त्रांचा अभिमान परकाेटीचा आहे.गाेहत्याबंदीच्या मागणीसाठी वारंवार बाैद्धभिक्षू तेथील श्रीबाैद्धदन्त मंदिरासमाेर आत्मदहन करून घेत, ही बाब सांस्कृतिक एकात्मतेचे प्रतीक आहे. ही मागणी फक्त आत्मदहनापुरती मर्यादित नसे. प्रत्येक गावच्या प्रत्येक स्तूप प्रार्थना स्थळात वारंवार या मागणीचे मेळावे भरत असत.अजूनही ती मागणी शंभर टक्के पूर्ण झालेली नाही. तेथे गाेहत्येला प्रतिबंध आहे. पण, गाेमांस आयात करणे आणि खाणे याला परवानगी आहे. तरीही त्याच्या विराेधात आंदाेलनेही सुरू आहेत.श्रीलंका हे बेट साहजिकच समुद्राने वेढलेले असल्याने तेथे मासे हा महत्त्वाचा आहार आहे. ताे बाैद्ध समाजातही आहे; पण तेथे गाय हे तपश्चर्येचे साधन आहे.वास्तविक श्रीलंका हा आपला सख्खा शेजारी आहे; पण आर्य द्रवीड वादामुळे ताे दुरावला आहे. प्रत्यक्षात श्रीलंकेत हा वाद नाही. पण, एलटीटीईसारख्या संघटनांनी दहशतवादाच्या आधारे भारतश्रीलंका संस्कृतींना जवळ येऊ दिले नाही.पण, आता वातावरण बदलले आहे.श्रीलंकेच्या इतिहासात जेवढे खाेल जावे तेवढी अतिशय जिव्हाळ्याची माहिती पुढे येते. तेथे तीन चार संस्कृतींचा अप्रतिम समन्वय आहे. पहिली म्हणजे रामायण काळातील वैदिक संस्कृती.वैदिक संस्कृतीतील अनेक संस्कृत ग्रंथांची निर्मिती श्रीलंकेतील आहे.श्रीलंकेत आजही जी भारतीय संस्कृती आहे ती प्रामुख्याने ओडिशावर आधारित आहे. याची दाेन प्रमुख कारणे आहेत. एक म्हणजे ओडिशातील कलिंगयुद्धानंतर बाैद्ध धर्म जगात पसरला. त्याचप्रमाणे अडीच हजार वर्षांपूर्वी ओडिशातील ‘विजय’ नावाचा एक तरुण श्रीलंकेत आला आणि राजा झाला. श्रीलंकेतील भाषा, लिपी, चालीरीती या साऱ्या ओडिशा आणि बंगाल पद्धतीच्या आहेत.
 माेरेश्वर जाेशी, 9881717855