श्रीलंकेतील गाेहत्याबंदी ही राष्ट्रीय चळवळीचा भाग

    05-Feb-2021   
Total Views |
गेल्या दीड हजार वर्षांत तेथे बाैद्ध परंपरा आहे. तेथील बाैद्ध लाेकसंख्या सत्तर टक्के आहे.पण त्यांनी वैदिक परंपरा आणि आयुर्वेद परंपरा टिकवून ठेवल्या आहेत.
 
स्व._1  H x W:
 
श्रीलंकेत गेल्या पाचशे वर्षांपासून गाेहत्याबंदीची मागणी हाेत हाेती.श्रीलंकेवर दीडशे वर्षे पाेर्तुगीजांची सत्ता हाेती. नंतरची काही शतके इंग्रजांची सत्ता हाेती. पाचशे वर्षापूर्वी एक एक हजार वर्षांचे असे टप्पे श्रीलंकेत घडले की, प्रत्येक टप्प्यावर माेठे बदल घडले.
गाेविज्ञान संस्कृतीच्या दृष्टीने ते अतिशय महत्वाचे आहेत. याचे कारण म्हणजे श्रीलंकेत आयुर्वेदाचा विकास झाला.त्यांचे राष्ट्रीय वैद्यक आयुर्वेद आहे. तेथे गाेवैद्यकाची माेठी परंपरा आहे. गेल्या दीड हजार वर्षांत तेथे बाैद्ध परंपरा आहे.तेथील बाैद्ध लाेकसंख्या सत्तर टक्के आहे. पण त्यांनी वैदिक परंपरा आणि आयुर्वेद परंपरा टिकवून ठेवल्या आहेत.महाराष्ट्र आणि श्रीलंका यांचा संबंध केव्हा आला, याचा फारसा पुरावा उपलब्ध नाही, पण मराठीतील अतिशय महत्वाचे दाेन शब्द तेथे जसेच्या तसे वापरले जातात. ते शब्द म्हणजे आई आणि माती. कदाचित महाराष्ट्र संस्कृती आणि श्रीलंका यांची संस्कृती यांचा माेठा संबंध आला असावा, याचे अजून एक कारण म्हणजे तेथे भातखंडे संगीत परंपरा माेठ्या प्रमाणावर आहे. इंग्रजांनी आणि ख्रिश्चन मिशनऱ्यांनी दक्षिण भारत आणि उत्तर भारत यात आर्य आणि अनार्य अशी दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यातून निर्माण झालेल्या समस्यांना श्रीलंका अजून ताेंड देत आहे.रावणाची प्रवृत्ती काय हाेती हे प्रत्येक भारतीयाला माहीत आहे. पण रावणाचा उल्लेख तेथील संस्कृत वाङमयात ‘हे आर्य’ असाच करण्यात आला आहे.आजही श्रीलंकेत रामायणाची माेठी परंपरा आहे.भारतीय संस्कृतीची जी चिन्हे पावलाेपावली भारतात दिसतात तशीच ती श्रीलंकेतही दिसतात. ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून श्रीलंकेला इ.सन 1948 मध्ये अंशत: स्वातंत्र्य मिळाले. पण स्वातंत्र्य मिळाल्यावर त्यांची श्रीलंका राष्ट्रवादाची चळवळ जाेराने सुरू झाली. त्यातील पहिला टप्पा म्हणजे त्यांनी त्यांच्या देशाचे नाव बदलले.‘श्री’ या शब्दाचे असामान्यत्व श्रीलंकेत पराकाेटीचे आहे. इंग्रजांच्या काळात त्या देशाचे नाव सिलाेन हाेते. त्याचे त्यांनी श्रीलंका केले. ही चळवळ तेवढ्यापुरती थांबली नाही. तेथील प्रत्येक वाहनाचा जाे क्रमांक असायचा, त्याच्या प्रारंभी जी अक्षरे असतात, ती अक्षरे ‘श्री’ने सुरू हाेत असत. श्रीलंकेत सिंहली आणि तामिळी वादात वाहनाच्या क्रमांकाच्या प्रारंभी श्री असण्याला तामिळींचा विराेध नव्हता. पण त्यांना ते तामिळीत हवे हाेते. श्रीलंकेच्या लाेकांना सिंहलीत हवे हाेते. त्यातून झालेले यादवीयुद्ध तेथे पन्नास वर्षे सुरू हाेते.
माेरेश्वर जाेशी, 9881717855