आता श्रीलंकेतही आला गाेहत्याबंदी कायदा

    04-Feb-2021   
Total Views |
भारतीय उपखंडातील श्रीलंका, नेपाळ, तिबेट, म्यानमार, लाओस, थायलंड, कंबाेडिया, व्हिएतनाम, इंडाेनेशिया येथील  गाेहत्याबंदीच्या लढ्याला माेठे महत्व आहे. या पाच देशांत सध्या गाेहत्याबंदीचा कायदा नाही.
 
द्द._1  H x W:
 
भारतातील गाेरक्षणाची माेहीम आणि गाेहत्याबंदीची चळवळ यामागे अनेक वर्षांचा इतिहास आहे, त्याचप्रमाणे श्रीलंकेतील गाेरक्षणाची माेहीम आणि गाेहत्याबंदीची चळवळ यामागेही माेठा इतिहास आहे. श्रीलंकेतील गाेहत्याबंदीचा कायदा हाेअून तीनच महिने झाले आहेत.ताे कायदा सप्टेंबर 2020 मध्ये झाला आहे.कायदा झाला तरी तेथे अजूनही गाेमांसाच्या मागणीचा मुद्दा सुटलेला नाही. आपल्याकडे या चळवळीने अनेक ऋषिमुनींचा त्याग आणि तपश्चर्या पाहिली आहे. त्याच्याही पलीकडे जाअून तेथील भगवान बुद्ध यांच्या दाताच्या स्मारकापुढे अनेक बाैद्ध भिक्कूंनी स्वत:ला जाळून घेतले हाेते. भारतात महंमद बिन कासीमचा हल्ला झाल्यापासून म्हणजे इ.सन 711 पासूनच गाेहत्येला आरंभ झाला.श्रीलंकेतील गाेहत्येचा इतिहास तेवढा जुना नाही पण गाेहत्याबंदीसाठी जाे चिवट लढा द्यावा लागला, त्याचा इतिहास फार माेठा आहे. वास्तविक भारतातील गाेरक्षण आणि गाेहत्याबंदी या भूमिकेएवढीच भारतीय उपखंडातील श्रीलंका, नेपाळ, तिबेट, म्यानमार, लाओस, थायलंड, कंबाेडिया, व्हिएतनाम, इंडाेनेशिया येथील गाेहत्याबंदीच्या लढ्याला माेठे महत्व आहे. या पाच देशांत सध्या गाेहत्याबंदीचा कायदा नाही. या देशात गाेहत्याबंदीची चळवळ अजूनही सुरू आहे. याहीपेक्षा चीन, काेरिया, जपान या देशात गाेहत्येची मागणी सुरू आहे, पण अजून तेथे आंदाेलनाएवढी स्थिती आलेली नाही. तेथे बाैद्ध धर्मियात मांसाहारी आणि गाेमांस कटाक्षाने न खाणारे असे दाेन पंथ आहेत.चीन हा जगातील सर्वांत माेठा मांसाहारी देश व त्यातही गाेमांस खाणारा देश आहे. ताे दर वर्षी काही लाख काेटी रुपयांचे गाेमांस बाहेरून मागवताे. तरीही तेथे गाेहत्याबंदीची मागणी करणाऱ्यांची संख्या माेठी आहे. यातील महत्वाचा मुद्दा असा आहे की, जेथे बाैद्ध संस्कृती आहे, तेथे गाेहत्येवर बंदी घातली पाहिजे, अशी मागणी करणारे लाेक असतातच.श्रीलंकेत त्या मागणीचाच भाग म्हणून कायदा झाला. पण वर उल्लेखिलेल्या प्रत्येक देशाची स्थिती भिन्न आहे.नेपाळमध्ये गाय हा राष्ट्रीय पशु आहे. पण तिबेटमध्ये गाेहत्येची मागणी हाेत असली तरीही तेथे ती मागणी करणेही अशक्य हाेत आहे कारण तेथे कम्युनिस्ट शासन आहे.चीनमध्ये प्रत्येक प्रांतानुसार याबाबतची भूमिका निराळी आहे. अजूनही चीनमध्ये भारत म्हणजे ‘मायबाप संस्कृतीचा देश’ असे मानणारांचा वर्ग माेठा आहे. या प्रत्येक देशाची आपण गाेरक्षण आणि गाेहत्याबंदी या संदर्भातील माहिती घेणार आहाेत.
 माेरेश्वर जाेशी, 9881717855