वशिंड असलेली जी भारतीय गाय आहे तिचे जगातील दाेनशे काेटी लाेक गाेपूजक असताना, दुसऱ्या बाजूला दर वर्षी जवळजवळ पन्नास काेटी भारतीय वंशाच्या गाईची हत्या हाेते.
एखाद्या बाबीशी जेव्हा तर्काच्या पलीकडचे नाते असते, तेव्हा विचार करण्याचा अतिशय महत्त्वाचा टप्पा सुटण्याची शक्यता असते. गाईबाबत काही अंशी तसे हाेते. निरनिराळ्या वैदिक संहितांमध्ये गाईला विश्वमाता मानले आहे. बाैद्ध वाययातही तीच स्थिती आहे. त्यामुळे गाेदान करण्यासाठी अनेकजण पुढे येतात, पण गाय सांभाळण्यासाठी फारसे पुढे येताना दिसत नाही.अनेक ठिकाणी गाईला गाेमाता म्हणून सांभाळणारेही लाेक आहेत, पण त्या गाईचा दुधाखेरीज उपयाेग काय, याचाही त्यांना पत्ता नसताे. भारतात जी स्थिती आहे तीच श्रीलंका, ब्रह्मदेश, इंडाेनेशियामध्ये दिसते. इंशाेनेशिया तर मुस्लिम देश आहे, पण तेथे गाय पूज्य मानली जाते. तरीही गाईची तस्करी, गाेमांसाचा व्यापार या ज्या भारतातील समस्या आहेत त्या तेथेही आहेत. असे असले तरी दाेन बाबींकडे लक्ष वेधणे आवश्यक आहे.ते म्हणजे वशिंड असलेली जी भारतीय गाय आहे तिचे जगातील दाेनशे काेटी लाेक गाेपूजक असताना, दुसऱ्या बाजूला दर वर्षी जवळजवळ पन्नास काेटी भारतीय वंशाच्या गाईची हत्या हाेते. जगातील भारतीय गाेवंशाची संख्या सुमारे शंभर काेटी आहे. ब्राझीलमधील भारतीय गाेवंशाची चित्रे किंवा व्हिडिओ बघितल्यास ती आपल्याकडील गाईपेक्षा अतिशय धिप्पाड, सुदृढ असतात. ती सारी वाढ त्या गाईचे मांस माणसाच्या शरीराला अधिकाधिक उपयाेगी ठरावे यासाठी केलेली असते. जपानमधील वाग्यू गाईला तर मद्य पाजून शरीराला मसाज केला जाताे. अधिक मसाज आणि अधिक मद्य असा प्रकार सुरू असताे. त्यामुळे त्या गाईचे मांस जगात ार महाग असते.भारतीय गाेवंशामागे जर दाेनशे काेटी लाेकांची आस्था किंवा श्रद्धा असेल, तर हा विषय जगापुढे संघटितपणे मांडता आला पाहिजे. संयुक्त राष्ट्र म्हणजे युनाे या आणि अशासारख्या अनेक जागतिक संघटनांनी अनेक बाबींना संरक्षित करून घेतले आहे. ती बाब गाईबाबत करता आली पाहिजे. ती प्रयत्नाने शक्य आहे.त्यासाठी दाेन बाबींची गरज आहे ती म्हणजे गाईची व्यवहारी जगातील उपयाेगिता ही जगासमाेर मांडावी. दहा किलाे शेणात एक एकर शेती, सर्व पद्धतीच्या राेगाेपचाराबराेबरच कॅन्सर, किडनी, हृदयराेग, मानसाेपचार, संस्कार, परिसर स्वच्छता, बांधकाम क्षेत्रात क्रांतिकारी संशाेधन याचा शक्य ताे वापर आणि प्रचार करावा. सुरुवात केल्यास माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात हा विषय जगाला समजायला वेळ लागणार नाही.
माेरेश्वर जाेशी, 9881717855