भारतीयांची मानसिकता ‘गाेमातेचे संरक्षण’ झाले पाहिजे, अशी आहे; पण या समस्या हाताळायला भारतातच इतक्या समस्या आहेत की, जगातील गाईंच्या संरक्षणाची बात सुरू केली, तर काेणी ऐकायलाही थांबणार नाही. पण, भारतातयश मिळाले, तसे भारताबाहेरही मिळेल यात शंका नाही.
यासाठी भारतीय गाेवंशाची किमान उपयाेगिता निश्चित करता आली पाहिजे.एक तर बाब स्पष्ट आहे की, गाईला गाेमाता मानणे हे किमान उपयाेग आणि कमाल उपयाेग या दाेन्हीही यादीत येत नाही. ताे वादातीत मुद्दा आहे. गाईसंबंधी बहुतेक मुद्दे तेथेच सुरू हाेतात आणि तेथेच संपतात. त्यामुळे ते सारे विषय सरकारी अनुदान, गाेशाळांसाठी वर्गणी, त्यासाठीचे समारंभ याभाेवती फिरतात.
ते हाेणेही साहजिक आहे; पण गाईमध्ये असलेली प्रचंड उपयाेगितेची क्षमता याकडे दुर्लक्ष हाेते. दैनंदिन जीवनात म्हणजे आर्थिक आघाडीवर त्याचा ायदा आहे, हे स्पष्ट झाल्याखेरीज त्याकडे काेणी लक्ष देणार नाही. याबाबत वस्तुस्थिती अशी आहे की, गाेवंशाच्या उपयाेगाची अशी दहा क्षेत्रे आहेत, तेथे त्यातील सध्याच्या वस्तुस्थितीच्या दहा पट फायदा आहे.अर्थात हे सहजासहजी काेणी मान्य करणार नाही. विसावे आणि एकविसावेही शतक हे विज्ञानाच्या कसाेटीचे शतक मानले जाते.त्यामुळे ती कसाेटी आणि ज्या प्रत्यक्ष घरगुती व्यवहारात फायदा हाेताना दिसताे, असे मुद्दे पुढे येणे आणि ते प्रत्यक्षात दिसणे याला अर्थ आहे. त्यादृष्टीने हा क्रांतिकारी प्राणी आहे. पण, त्याचे फायदे किराणा दुकानात ज्याप्रमाणे वस्तू मांडून ठेवलेल्या असतात, त्याप्रमाणे नाहीत. ते फायदे समजून घ्यायला आपणही थाेडे पुढे गेले पाहिजे. या फायद्यात प्रथम म्हणजे दुधाचा ायदा माेठ्या प्रमाणावर गृहीत धरलेला नाही. देशी गाईचे दूध हे अमृताप्रमाणे आहे, याबद्दल वाद नाही; पण ते शुद्ध स्वरूपात पदरात पडणे कठीण असते.दुसरे असे की, गाईने अधिक दूध द्यावे म्हणून अलीकडे फक्त अधिक चांगला पाेषक आहार देऊन थांबत नाहीत, तर अधिक दूध देणाऱ्या रासायिनक गाेळ्या दिल्या जातात. काेणत्या तरी औषधामुळे गाईचे दूध पाच लिटरपासून वीस लिटरपर्यंत वाढते, यात त्या गाईच्या प्रकृतीची हानी हाेते. अलीकडे गाईने वीस ते चाळीस लिटर दूध देण्याचेही प्रयाेग सुरू आहेत. अधिक दूध देण्यात गवळ्याचा फायदा असताे हे साहजिकच आहे; पण गाईचे गाईपण टिकवले जात नसेल, तर काेणतीही बाब धाेक्याची आहे. पंचवीस वर्षांपूर्वी संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्रद्धेय माेराेपंत पिंगळे यांनी असे मत व्यक्त केले हाेते की, दूध न देणारी गाय हाच आपला अभ्यासाचा विषय असला पाहिजे. त्यावर गेले पंचवीस वर्षे जे संशाेधन सुरू आहे, त्यातून अनेक पटींनी उपयाेगी ठरणारे मार्ग मिळाले आहेत.
माेरेश्वर जाेशी, 9881717855