सामान्य माणूस जेव्हा शेतातील रासायनिक खते घातलेले अन्न खाताे, तेव्हा त्या घरातील अन्नखर्चापेक्षा औषध खर्च जादा असताे आणि जेव्हा ताे माणूस या जनावरांचे मांस खाताे तेव्हा औषधाची मर्यादाच ओलांडली जाते.
याबाबत ब्रिटनचे ब्रिस्टल इस्टमधून निवडून आलेले लेबर पक्षाचे खासदार केरी मॅक कॅरथी यांनी याबाबत असे बाेलून दाखवले आहे की, जेथे अशा जनावरांचे मांस पाेहाेचले आहे, तेथे राेग पाेहाेचले नाहीत, अशी जागा मिळणे कठीण आहे.केरी मॅक कॅरथी यांचे म्हणणे असे की, जनावरांच्या सागरी वाहतुकीतून असे प्रकार अपरिहार्य झाले आहेत. त्याऐवजी त्यावर पूर्ण बंदी घालणे हा एकमेव मार्ग आहे.ब्रिटनच्या खासदारसाहेबांनी जरी कत्तलखान्याच्या दिशेने जाणाऱ्या जनावरांच्या वाहतुकीवर बंदीचा प्रस्ताव दिला असला, तरी याची परवानगी असतानाही माेठ्या प्रमाणावर चाेरटी वाहतूक हाेत असते. कारण त्यातून बचत हाेते. सप्टेंबर 20 मध्ये न्यूझीलंडमधून चीनकडे सहा हजार जनावरे घेऊन जाणारे एक जहाज जपाननजीक समुद्रात बुडाले.त्याचा गवगवा झाल्यावर या वाहतुकीला काही दिवस आळा बसला; पण आता ती पुन्हा सुरू झाली आहे. त्या सहा हजार जनावरांच्या निर्यातीपूर्वी एक महिना चाैदा हजार जनावरांना घेऊन एक जहाज न्यूझीलंडवरून चीनला गेले हाेते.चीनमध्ये असे प्राणी हाताळण्याची समस्या अजूनही कठीण आहे. तेथील वेटमार्केंट म्हणजे पशुमांस बाजार येथे कसे व्यवहार चालतात हा विषय काेराेना कसा पसरला या निमित्ताने पुढे आलेल्या माहितीतून स्पष्ट झाले आहे. चीन हा देश अगदी गेल्या वर्षीपर्यंत अमेरिकेकडून दर वर्षाला पंधरा हजार काेटींचे गाेमांस मागवत असे.या साऱ्या समस्येतून तीन निराळेच प्रश्न उपस्थित हाेतात. एक म्हणजे ‘काेविड19’ने जगात गेल्या एका वर्षात एवढा धुमाकूळ घातला असला, तरी त्याची कारणमीमांसा करण्यास जगातील आघाडीच्या देशांनाही अजून सवड सापडलेली नाही. त्यातील एक गाेष्ट स्पष्ट आहे की, ताे जनावरांच्या, पक्ष्यांच्या, मांसाच्या नीट न हाताळण्याने तयार झाला आहे. दुसरे म्हणजे या मांसाहारासाठी पाठविण्यात येणाऱ्या प्राण्यांत निम्मे प्राणी गाई म्हणजे गाेवंश असतात आणि त्यातील निम्मे प्राणी हे भारतीय गाेवंशाचे असतात. आज भारतात देशी गाेवंशाची संख्या पंधरा काेटी आहे; पण ब्राझीलमध्ये वीस काेटी आहे. ती संख्या फक्त बीफच्या निर्यातीसाठी आहे. दक्षिण आि्रकेतच ही संख्या ब्राझीलच्या दुप्पट आहे. आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, आग्नेय आशिया मिळून भारतीय गाेवंशाची संख्या शंभर काेटींच्या घरात आहे.
माेरेश्वर जाेशी, 9881717855