पशू वाहतूक बाेटी ही राेगांच्या साथीची आगर

    26-Feb-2021   
Total Views |
 
जगातील आघाडीच्या देशांचे अहवाल आणि काही संशाेधने यांच्या आधारे वन ग्रीन प्लॅनेट या संघटनेचे म्हणणे असे की, जाहिरातबाजीसाठी कत्तलखान्यातील आराेग्याची काळजी घेणारी दृश्ये दाखविली, तरी जमिनीवरील स्थिती एकदम निराळी आहे.  
aw_1  H x W: 0
 
मांसाहारासाठी दरवषीं कांही अब्ज प्राणी कत्तलखान्याकडे वाहतूक केले जातात. यावरील दुरवस्थेची छायाचित्रे काेठे प्रसारमाध्यमात आली की, चार दाेन दिवस परिस्थिती नीट असते आणि लगेचच त्यातील अमानुष प्रकार सुरू हाेतात. कारण त्यामुळेच प्रचंड आर्थिक फायदा मिळत असताे. ही वाहतूक हवाईमार्गे, जमिनीवरून आणि समुद्रमार्गे हाेते. एकेका जहाजात हजार हजार पशू ही तर सर्वसाधारण वस्तुस्थिती आहे. पन्नास पन्नास हजार पशूंची वाहतूक करणारी जहाजे आजही आहेत. मारण्यासाठीच नेल्या जाणाऱ्या या पशूंची काळजी घेण्याची मानसिकताच त्या वाहतूक करणारांना नसते.हे पशू आफ्रिका. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अमेरिकेतून उपलब्ध केले जातात.हे पशू जगातील लॅटिन अमेरिका, आि्रका वगैरे भागातून गाेळा हाेत असले, तरी त्यांचा व्यापार करणाऱ्या प्रमुख कंपन्या अमेरिका, डेन्मार्क, नेदरलँड, कॅनडा, सुदान, ऑस्ट्रेलिया आणि स्पेनमध्ये आहेत. आणि हे पशू अमेरिका, साैदी अरेबिया, पाेलंड, इटली, हाँगकाँग, तुर्की, कतार येथे जात असतात. कारण तेथे ते स्वीकारणाऱ्या कंपन्या आहेत.अमेरिका हा देश स्लाॅटरमास्टरही आहे, आयातदारही आहे आणि निर्यातदारही आहे. ही वाहतूक काही आठवडे ते काही महिने सुरू असते. ते प्राणी अतिशय हालाखीच्या प्रकृतीचे, अशक्त डाेळ्यांचे, पाेटात रिंगवर्म असलेले, पाेटाचे आणि हृदयाचे विकार असलेले, जखमी अशा स्थितीत असतात. जुनी झालेली व नादुरुस्त असलेली जहाजे या कामासाठी उपलब्ध हाेतात.काही आठवडेच्या आठवडे ती आपल्याच शेणात पडून असतात.एका बंदरापासून निघाल्यापासून ते दुसऱ्या बंदरापर्यंत पाेहाेचेपर्यंत ती फक्त राेगांचे आणि साथींच्या राेगांचे वाहक बनण्याचीच स्थिती झालेली असते. वन ग्रीन प्लॅनेटचे छायाचित्रकार राेईश श्प्रनिक यांनी काढलेली काही छायाचित्रे साेबत दिलेली आहेत. सव्वीस दिवस त्याचा प्रवास सुरू हाेता. ती शेणाने आणि घाणीने माखलेली ती जनावरे काेणता ना काेणता राेग पसरवणार याची खात्रीच पटत हाेती. त्या जनावरांना कधी टाेकाची उष्णता, जुलाब, काेंडमारा यांचा सामना तर करावा लागताेच; पण जनावर हेही वेदना आणि तणाव सहन करत असते, हे लक्षात घेतले तर काही तरी याेजना करता येते. यातून जनावरांना हमखास हाेणारे राेग म्हणजे आफ्रिकन स्वाइन फ्लू व्हायरस, निपाह व्हायरस हे हाेते. जगातील हे जनावरांसाठीचे अतित्रासदायक राेग मानले जातात.
 माेरेश्वर जाेशी, 9881717855