एक हजार वर्षांपूर्वी भारतावर परकीय आक्रमणे हाेण्यापूवीं गाय हा अनेक अर्थांनी भारतीय जीवनाच्या मध्यवर्ती हाेता. पराशरसंहितेपासून काैटिल्याच्या वाययापर्यंत पाहिले, तर यांनी गाेविज्ञानाला शेकडाे सिद्धांतांनी समृद्ध केले आहे.
गेल्या एक हजार वर्षात पहिली चार वर्षे गझनी, घाेरी, अल्लाउद्दिन खिलजी यांच्या आक्रमणांमुळे हा विषय मध्यवतीं राहिला नाही. नंतर माेंगलांच्या चारशे वर्षांंच्या काळात गाेहत्या हा नियम झाला.नंतर ब्रिटिशांनी सुमारे दाेनशे दहा वर्षांपूर्वी पार्लमेंटमध्ये कायदा करून काेलकात्यात गाेहत्या सुरू केली. स्वातंत्र्यानंतर हे सारे प्रमाण कमी हाेण्याऐवजी वाढले. गेल्या पाच वर्षांत या विषयाला जाग आली आहे.राजकीय पातळीवर कायदा करणे, गाेशाळांना अनुदान देणे आणि शासकीय पातळीवर कांही गाेविज्ञानाची कामे सुरू ठेवणे हे सुरू आहे. पण, गाेविज्ञान अनुसंधान संस्थांनी गेल्या पंचवीस वर्षांत जगात काेठेही सुरू करता येणारा असा पातळीचा ताे विषय करून ठेवला आहे.हा विषय जाणकारांना माहीत आहे; पण भारतात गाेमाता हिची उपयाेगिता व्यापक असूनही ती फक्त देव असल्याचीच भावना लाेकमानसात असल्याने गाईचे शेपूट डाेळ्याला लावून नमस्कार करणे एवढ्यापुरती ती मर्यादित राहिली आहे.
पण, जे गाईला देवता म्हणून नमस्कार करतात किंवा उपयाेगी पशू म्हणून त्याकडे बघतात, त्याचप्रमाणे गाेवैद्यक, गाईच्या शेणाच्या आधारे केलेले वैदिक प्लॅस्टर असे जे स्वतंत्र दहा विषय आहेत ते हाताळणाऱ्यांनी एक छाेटे छाेटे पाऊल पुढे टाकले, तरी हे काम हाेण्यासारखे आहे.आज गाईच्या दहा किलाे शेणात एक एकर शेती हाेत आहे. पाेटातील अपचनापासून ते कॅन्सरचे रुग्ण बरे हाेईपर्यंत गाेवैद्यकाचे उपचार हाेत आहेत. सामान्य माणसाच्या जीवनात अतिशय उपयाेगी पडणारी दहा क्षेत्रे काेणती हे पाहण्यासाठी थाेडे खाेलवर जावे लागेल. ते समजून सांगण्यासाठीच मी गेल्या चार वर्षात दै. संध्यानंद व अन्य दैनिकात मिळून चाैदाशे छाेटे आणि माेठे लेख लिहिले आहेत, ते ज्यांच्यापर्यंत पाेहाेचले त्यांचा चांगला प्रतिसाद आहे.सध्याच्या घडीला यातील दाेन दुर्लक्षित संदर्भ समजून घेणे आवश्यक आहे. एक म्हणजे काेराेना या वैश्विक महामारीचे कारण सकृतदर्शनी तरी बेजाबदारीने हाताळलेला मांसाहार आहे.आणि दुसरे म्हणजे जगात महाभयंकर राेगराई पसरवणाऱ्या मांसाहार निर्मितीची स्थिती काय आहे? मांसाहारासाठी गाेवंशाची आणि त्यातही भारतीय वशांच्या गाेधनाची निर्यात करणाऱ्या देशांची संख्या शंभर आहे. युनायटेड स्टेटसारख्या महासत्तांची स्थिती अशी आहे की, ते निर्यातही करत असतात आणि आयातही करत असतात.निर्यात करणाऱ्या देशात दक्षिण अमेरिका, संपूर्ण आफ्रिका, भारतीय उपखंड, आग्नेय आशिया आणि ऑस्ट्रेलिया यांचा समावेश आहे.
माेरेश्वर जाेशी, 9881717855