जगात मांसाहाराचा मुद्दा जबाबदारीने हाताळला गेला नाही, हे आहे. जगातील बहुतेक महत्वाचे साथीचे राेग हे मांसाहारामुळे हाेत असतात आणि ताे प्रकार नीट न हाताळल्याने अनेक देशात पसरत असतात, ही वस्तुस्थिती आहे.
जगातील ‘वन ग्रीन प्लॅनेट’. या संघटनेने इजिप्तमधून पाठवलेल्या एका अहवालानुसार मांसाहारासाठी जगातील दरराेज पाच लाख पशुंची वाहतूक सुरूच असते. ती वाहतूक पाच दिवसांपासून ते पन्नास दिवस आणि शंभर दिवस अशा मुदतीचीही असते.त्या काळातील त्यांची जी छायाचित्रे प्रकाशित झाली आहेत, त्यानुसार त्यातील निम्म्याहून अधिक पशू मृत्यू पावतात. हा मुद्दा फक्त त्या जनावरांना किती महाभयंकर यातनांना सामाेरे जावे लागते, एवढ्यापुरता मर्यादित नाही.तर त्या मृत जनावरांचे मांस जगभर मांसाहारी लाेकांच्या किचनटेबलवर पाेहाेचते. जगातील साथीच्या राेगांच्या बहुतेक समस्या अशामधूनच पसरलेल्या आहेत. या विषयाची अतिशय महत्वाची बाजू म्हणजे आपण अशाच निष्काळजीपणामुळे हाताळलेल्या गेलेल्या महामारीचे भक्ष्य झालेले आहाेत.
सध्याच्या महामारीचे नाव ‘काेराेना’ आहे. त्यात मृत्यूचा आकडा दरराेज वाढताे आहे, हे सांगायला आता पुराव्याची गरज नाही. पण जगातील काेट्यवधी लाेक संदर्भहीन हाेऊन बसले आहेत. आत्ताच्या अहवालानुसार जगाची अर्थव्यवस्था पाच वर्षे मागे गेलेली आहे आणि अजून ‘काेविड 19’ प्रदीर्घ काळ व्यापेल, असा अंदाज दिसताे आहे, ताे पाहता जगाची आर्थिक स्थिती आणखी दहा वर्षें मागे जाईल, असे म्हटले जात आहे.याचे महत्वाचे कारण म्हणजे जगात मांसाहाराचा मुद्दा जबाबदारीने हाताळला गेला नाही, हे आहे. काेराेनाच्या वैश्विक महामारीनंतरही ताे जबाबदारीने हाताळला जाताना दिसत नाही.जगातील बहुतेक महत्वाचे साथीचे राेग हे मांसाहारामुळे हाेत असतात आणि ताे प्रकार नीट न हाताळल्याने अनेक देशात पसरत असतात, ही वस्तुस्थिती आहे.
माेरेश्वर जाेशी, 9881717855