जगातील मांसाहारात निम्मा मांसाहार हा गाेमांसाचा आहे आणि त्यातील निम्मा गाेमांसाचा पुरवठा भारतीय गाेवंशापासून पुरविला जाताे. जगातील काेणत्याही भागाला ‘गाय ही गाेमाता’ आहे म्हणून गाेमांस साेडण्याची इच्छा नाही.
गाेआधारित शेतीतून दहा टक्के ते तीस टक्के एवढ्या कमी खर्चात तीन चार पटीने अधिक परिणाम देणारी जैविक शेती हाेत आहे, हे जर हजाराे उदाहरणांनी पुढे आले तर जग ते स्वीकारील.गेल्या दहा पंधरा वर्षांतील प्रयाेगामुळे कांही लाख एकरात हे प्रयाेग सिद्ध झाले आहेत. त्यामुळे गाेविज्ञान हे चांगल्या जीवनाला पर्याय आहे आणि काेराेनाच्या आणि त्याचप्रमाणे यापुढे येणाऱ्या अशासारख्या संकटांना ताे पर्याय आहे, हे आपण ठामपणे सांगू शकताे. या विषयाचा भारतापुरता विचार करायचा झाल्यास येथे देशात पूर्वीपासून गाईबाबत आदरभाव आहे. स्वातंत्र्य चळवळीत स्वातंत्र्यानंतरचे पहिले सार्वजनिक काम असा उल्लेख महात्मा गांधीनीही केला हाेता, त्यामुळे संविधान, कायदेमंडळ यांच्या पातळीवर हा विषय गाेरक्षणाच्या नावाने परिचित हाेता. त्यानंतरच्या पन्नास साठ वर्षांत हा विषय एका बाजूला कसाईखान्याबाहेर गाेरक्षणाच्या मागणीसाठी आंदाेलन आणि दुसऱ्या बाजूला भारत जगातील सर्वात अधिक गाेमांस निर्यात करणारा आणि त्यामुळे अधिकाधिक विदेशी चलन मिळवून देणारा देश, अशा पद्धतीने उल्लेखिला गेला. जगातील प्रत्येक देश असे मांस निर्यात करणारा देश किंवा आयात करणारा देश येथे काेठेना काेठे आहेच. पण गेल्या पंचवीस वर्षांत गाेविज्ञानाच्या विषयाने अशा दहा क्षेत्रात काम करून यश मिळवले आहे की, लाेकजीवनातील त्या दहा क्षेत्रांतील खर्च दहा टक्क्यांवर आले आहेत.भारतात हा विषय ज्या गतीने पसरला त्यापेक्षा थाेडया कमी गतीने जरी जगात पसरला तरी हे अंतर कापले जाणार आहे.
गाेआधारित शेती आणि गाेवैद्यक हे विषय या ना त्या निमित्ताने परिचित हाेते. पण आता शहरांच्या भाेवती असणारी काही लाख मेट्रिक टन दुर्गंधीयुक्त विषारी घाण यापासून ते देशातील निसर्गवायू इंधनालाही पर्याय देणे, बांधकाम या क्षेत्रातही तेवढाच प्रभाव दिसू लागला आहे. तरीही अजून गाेविज्ञान ही मास मुव्हमेंट झालेली नाही.ती क्लासेस मुव्हमेंटच राहिलेली आहे.पण याची उपयाेगिता जगातील साथीचे राेग दूर करण्यासाठी अपरिहार्य आहे, हे जेव्हा जगाला समजेल, तेंव्हा आपाेआपच मास मुव्हेमेंट बनणार आहे.एखादी गाेष्ट मास मुव्हमेंट बनेल, असा आशावाद करायला हरकत नाही, अशा सदिच्छेतून मी हे विधान करत नाही.
माेरेश्वर जाेशी, 9881717855