सध्या प्रत्यक्ष मांसासाठी जनावरांची वाहतूक आणि प्रत्यक्ष मांस यांची जगातील अधिकृत सागरी वाहतूक पंचवीस काेटी मेट्रिक टन आहे.
मानवी जीवनाच्या आरंभापासून शाकाहार आणि मांसाहार हे दाेन्हीही माणसाच्या वापरात हाेते. पण अगदी पंधराव्या शतकात युराेपीय लाेक प्रथम भारत जिंकण्याच्या उद्देश्याने, नंतर अमेरिका आणि नंतर सारे जग जिंकण्याच्या उद्देश्याने बाहेर पडले.तीन महिने ते सहा महिने चालणाऱ्या या प्रवासात मांसाहारासाठी ते प्राणीही घेऊन निघू लागले. ते ज्या देशात उतरत तेथे पिके हाती घेण्याआधी जनावरे मारून मांसाहार हाच एक पर्याय असे. शंभर वर्षांतच मांसाहार हीच आक्रमणाची एक ओळख बनली. हाच प्रकार गेल्या पाचशे वर्षांत वाढत्या श्रेणीने वाढताे आहे. सध्या काेणत्याही देशातील नागरी स्वच्छतेच्या कायद्यानुसार स्वच्छता पाळावी लागते.पण दाेन देशांतर्गत व्यापारात ‘स्वच्छता आणि आराेग्य’ हा शब्द बासनात गुंडाळून ठेवला जाताे. सध्या प्रत्यक्ष मांसासाठी जनावरांची वाहतूक आणि प्रत्यक्ष मांस यांची जगातील अधिकृत सागरी वाहतूक पंचवीस काेटी मेट्रिक टन आहे.बेकायदेशीर मार्गाने सुरू असणाऱ्या अशा व्यवहाराचा मागाेवा घेतला तर ती अनेक पटींनी जास्त आहे. दक्षिण आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका येथील प्रत्येक देशांची अर्थव्यवस्थाच त्यावर अवलंबून आहे. ब्राझीलमध्ये भारतीय वंशाच्या गाेवंशाची नाेंद वीस काेटी आहे, पण हा गाेवंश दरवर्षी संख्येने निम्मा हाेताे आणि परत तेवढाच हाेताे. आजपर्यंत हा विषय किती वाईट आहे आणि आराेग्याला घातक आहे, या कसाेटीने चर्चिला जायचा पण आता त्यातून पसरणारे काेराेनासारखे साथीचे राेग लक्षात घेता मांसाहारी आणि शाकाहारी या साऱ्यांचेच जीवन धाेक्यात आले आहे.त्यामुळे गेल्या पंचवीस वर्षांत गाेविज्ञानाचे जे प्रयाेग भारतात केले ते सारे प्रयाेग आता जागतिक पातळीवर करण्याची आणि जगाला समजावून देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.भारताला वैभवाप्रत नेणारी प्रत्येक बाब जाेपण्याच्या ध्येयाचे पाईक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
माेरेश्वर जाेशी, 9881717855