गाेवैज्ञानिक पद्धतीने बांधकाम लाभदायक

    19-Feb-2021   
Total Views |
एकेकाळी आपल्या आधीच्या सर्व पिढ्या अशाच घरात राहात हाेत्या. त्याचे फायदेही आपल्याला ऐकून माहीत आहेत हा विषय नव्याने पुढे येत आहे. त्यासाठी या क्षेत्रातील जाणकारांनी आणि अन्य नागरिकांनीही पुढे येऊन अनुभव घेतला पाहिजे. त्याबाबत शंका विचारल्या पाहिजेत.
 
a1_1  H x W: 0
 
शेणाच्या विटेचे घर आणि शेणाच्या प्लॅस्टरचे घर पारंपरिक घरापेक्षात तीस टक्के स्वस्त पडते; पण अशापद्धतीने त्यांची तुलना केली, तर शेणाच्या घराचे माेल तुमच्या लक्षात येणार नाही. त्याचे अजूनही अनेक आर्थिक फायदे आहेत.पण, त्याही फूटपट्टीने बघू नये, याचा अधिक चांगला फायदा म्हणजे अशा घरात मुलांचा अभ्यास चांगला हाेताे.घरात सकारात्मक वातावरण असते, याची अनुभूती देणारे काेणतेही यंत्र माझ्याजवळ नाही. पण, ज्यांच्या घरी गाय आहे, अशाच घरी जाऊन ‘सकारात्मक वातावरण’ याचा अनुभव घेतला पाहिजे.सिमेंटच्या घरापेक्षा हे शेणाचे घर प्रत्येक आघाडीवर फायद्याचे आहे, तरीही ती तुलना फारच मर्यादित आहे. दिल्लीत राहणाऱ्या लाेकांजे आयुष्यमान तेथील प्रदूषित हवेमुळे प्रत्येकी आठ वर्षांनी कमी झाले आहे, हा शास्त्रज्ञांचाच अहवाल आहे. या गाईच्या शेणाच्या विटेच्या आणि प्लॅस्टर केलेल्या घरात त्या प्रदूषिततेपासून लाेकांना सुटका मिळेल. याचा अनुभव काेणतेही पुस्तक वाचून किंवा आमचे निरनिराळे इंटरव्ह्यू पाहून वाचून ऐकून येणार नाही.आम्ही जेवढे बांधकाम केले आहे, त्याठिकाणी येथून शक्य तेवढा वेळ राहून त्याची खात्री करून घ्यावी लागेल. याची वीट तयार कशी करायची याचे आम्ही अभ्यासवर्ग घेताे, त्यात सहभागी हाेणाऱ्यांना आमची अशी अटच असते की, आमचा तीन दिवसांचा अभ्यासवर्ग संपल्यावर त्यांनी स्वत:ची दहा बाय दहाची खाेली बांधली पाहिजे.गाईबैलाच्या शेणाची वीट, त्याचे घर, त्याचेच प्लॅस्टर ही कल्पना सध्याच्या काळात नवीन आहे. एकेकाळी आपल्या आधीच्या सर्व पिढ्या अशाच घरात राहात हाेत्या. त्याचे ायदेही आपल्याला ऐकून माहीत आहेत; पण ते ऋषिमुनींचे संशाेधन हाेते असे मान्य करायला आपण आज तयार नाही.हा विषय नव्याने पुढे येत आहे.त्यासाठी या क्षेत्रातील जाणकारांनी आणि अन्य नागरिकांनीही पुढे येऊन अनुभव घेतला पाहिजे. त्याबाबत शंका विचारल्या पाहिजेत. ज्यांना आर्थिक विचार करायचा असेल त्यांच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तेथे एसी आणि हिवाळ्यात हिटर लागताे, तेथे ते लागत नाहीत. उत्तर भारतात टाेकाची थंडी टाेकाचा उन्हाळा असताे. तेथे जर थंडीत उबदार आणि उन्हाळ्यात शीतल वातावरण राहात असेल, तर ते निश्चितच विशेष म्हणावे लागेल.
 माेरेश्वर जाेशी, 9881717855