गाेवैज्ञानिक बांधकाम : घरीच तयार केली प्रयाेगशाळा

    18-Feb-2021   
Total Views |
गाेवंशाच्या आधारे बांधकाम साधने तयार करण्यावर ते गेली वीस वर्षे काम करत आहेत. त्यासाठी त्यांची स्वतंत्र प्रयाेगशाळा नव्हती, की त्यांना त्यासाठी संपूर्ण वेळही देता येत नव्हता. शेणाच्या विटा आणि शेणाचे प्लॅस्टर यांचे त्यांनी शेकडाे प्रकार तयार केले. त्यातून त्यांना हळूहळू त्यातील ‘गमक’ कळू लागले.
 
as_1  H x W: 0
 
अंबाला येथील राहणाऱ्या वाणी गाेयल यांच्या साहाय्याने त्यांनी वीट तयार केली.शेणाची वीट आगीने जळू नये, पावसात ती गळू नये, अशी महत्त्वाची कसाेटी त्यांनी तेथे पार केली. एका विटेला चार रुपये खर्च आला. त्यांच्याकडे फक्त तीन गाई आणि एक बैल हाेता. अधिक प्रयाेगाला ते कमी हाेते. याचे माेठे प्रयाेग करायचे झाले, तर जागा आणि यंत्रणाही माेठी हवी. त्यासाठी काही मित्रांच्या मदतीने बिकानेर येथे प्लांट उभा केला. हा विषय सुरू झाल्यावर इ.सन 2004 मध्ये छाेटी दैनिके आणि साप्ताहिके त्याची बातमी देऊ लागले. त्या एका बातमीचा संदर्भ घेऊनच त्यावेळचे राष्ट्रपती डाॅ. अब्दुल कलाम यांनी त्यांना बाेलावून घेतले व त्यांचा प्रयाेग समजून घेतला. त्यानंतर त्यांचे काैतुकही केले.केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह त्यांनी त्यांचे कार्यालय या शेणापासूनच्या विटा आणि वैदिक प्लॅस्टर यातून तयार करून घेतले. या नंतर या विषयाची सर्वत्र चर्चा हाेऊ लागली. त्यामुळे हरियानातील एका कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ काेविंद यांच्या हस्ते ‘हरियाना कृषी रत्न’ हा सन्मान देण्यात आला.या शेणाची वीट आणि वैदिक प्लॅस्टर यांच्या आधारे अनेक ठिकाणी बांधकामे सुरू झाली आहेत. त्यातील महत्वाची गाेष्ट म्हणजे विकिरणमुक्त घर. म्हणजे रेडिएशन्री घर. दाेन महिन्यांपूर्वी कामधेनू आयाेगाचे अध्यक्ष डाॅ. वल्लभ काथिरिया यांनी गाईच्या शेणाच्या चीपपासून माेबाईल हा रेडिएशन्री हाेताे, असे सांगितले त्याला अनेकांनी आक्षेप घेतला, पण वैदिक प्लॅस्टर याचे संशाेधन केलेले डाॅ. शिवदर्शन मलिक यांनी त्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. त्यांच्याच शेणाच्या विटेने बांधलेल्या घरात इलेक्ट्राे मॅग्नेटिक रेडिएशन मीटरच्या आधारे त्याचे प्रात्यक्षिक दाखविले.आपल्या घरात सर्वाधिक रेडिएशन येणारी जागा म्हणजे विजेच्या तारा. तेथे तेराशे सत्तरपर्यंत रेडिएशन असते. ताे विजेचा स्वीचबाेर्ड आणि रेडिएशन मीटर यात संगमरवराची फरशी किंवा लाकडाची फळी धरली, तर ते रेडिएशन शंभरने कमी हाेते; पण शेणाची वीट धरली तर ते शून्य हाेते. त्याच बराेबर त्यांनी घरात शेणाच्या आधारे केलेल्या दिव्याचाही उपयाेग दाखवला. ते म्हणाले, त्यामुळे घरातील दूषित बॅक्टेरिया तर जातीलच पण घरातील डांसही जातील. या साऱ्या बाबी आपल्या वाडवडिलांना माहीत हाेत्या. पण, तेव्हा सारी ओढ पाश्चात्त्य आकर्षक बाबीकडे हाेती, त्यामुळे त्या बाबी काळाच्या ओघात लुप्त झाल्या. पण आज पुन्हा ज्या दिसत आहेत, त्यातूनही आपण त्या साऱ्या बाबींचे पुनर्जीवन करू शकताे.
 माेरेश्वर जाेशी, 9881717855