गाेआधारित शेती असाे किंवा गाेवैद्यक असाे, अशी एकूण दहा क्षेत्रे आहेत, की ज्यात गाेवंशाचा फार माेठ्या प्रमाणावर उपयाेग स्पष्ट झाला आहे. आज अशा एका विषयाचा परिचय करून घेत आहाेत की, ज्यामुळे बांधकाम क्षेत्राचे अर्थशास्त्र बदलून जाणार आहे.
गाईच्या शेणाने अवघ्या दहा किलाे शेणात एक एकर शेतीचे खत हाेते, असा विषय महाराष्ट्रात अनेकांना परिचित झाला आहे. ज्यांनी हा विषय प्रथमच ऐकला आहे, त्यांना ताे फक्त अतिशयाेक्त नव्हे तर थिल्लरबाजी वाटेल; पण त्यात थाेडे जरी लक्ष घातले, तर ते पटणे सुरू हाेईल.त्याचप्रमाणे कॅन्सर आणि किडनीसारख्या विकारावर गाैवैद्यकाचा उपयाेग हाेताे आणि त्यातील वेदनेची समस्या तर तीन चार दिवसांत सुसह्य हाेते. हे सारे प्रत्यक्ष पाहून विश्वास ठेवण्याचे विषय आहेत.अशी एकूण दहा क्षेत्रे आहेत की, जेथे गाेवंशाचा उपयाेग फारच उपयाेगाचा आहे.पुण्यात गाेविज्ञानाच्या अशा विषयावर काम करणारी संस्था आहे, जी देशातील शंभराहून अधिक अशास्वरूपाचे काम करणाऱ्या संस्थेशी जाेडली गेलेली आहे.सध्या तेथे नियमितपणे दरराेजची उपचार ओपीडी सुरू आहे. गाेआधारित शेती असाे किंवा गाेवैद्यक असाे, अशी एकूण दहा क्षेत्रे आहेत, की ज्यात गाेवंशाचा ार माेठ्या प्रमाणावर उपयाेग स्पष्ट झाला आहे. आज अशा एका विषयाचा परिचय करून घेत आहाेत की, ज्यामुळे बांधकाम क्षेत्राचे अर्थशास्त्र बदलून जाणार आहे.याचा साऱ्या देशातही उपयाेग आहे; पण जेथे कडक्याची थंडी आणि तीव्र उन्हाळा असताे, तेथे याचा उपयाेग अधिक हाेताे.कारण उन्हाळ्यात शीतलतेची गरज असते आणि कडाक्याच्या थंडीत उबदार वातावरणाची गरज असते.गाईच्या शेणाच्या आधारे वीट आणि प्लॅस्टर यातून त्यांनी सुरुवात केली आहे.प्लॅस्टरमध्ये इप्समचा अधिक उपयाेग हाेताे. एक दाेन मजल्याची घरेतर त्या विटांनीच बांधता येते. हे संशाेधन आणि विकास हरियानातील डाॅ. शिवदर्शन मलिक (माेबाईल नं 9812054982) यांनी केले आहे. बहुमजली इमारतीला स्केलेटन काम सिमेंटचे आणि विटांचे काम या वैदिक प्लॅस्टरच्या विटांचे केले, तर त्याचा खर्च तर कमी येताेच पण खर्च कमी येणे ही त्यांतील ारच कमी महत्त्वाची बाब आहे. त्यातील महत्त्वाची बाब म्हणजे थंडीत ते घर अतिशय उबदार असते आणि कडा्नयाच्या उन्हाळ्यात ते घर शीतल असते. उत्तर भारतात हा विषय अनेक ठिकाणी हाताळला गेला आहे. राष्ट्रपती रामनाथ काेविंद यांनी त्यांचा सन्मानही केला आहे. दिवंगत राष्ट्रपती डाॅ. अब्दुल कलाम यांनीही हे काम पाहून गाैरवाेद्गार काढले आहेत.
माेरेश्वर जाेशी, 9881717855