गाई - म्हशींची गेल्या शंभर वर्षांची माहिती हाताशी

    16-Feb-2021   
Total Views |
गाेवंशाचे गाेमांस करण्यापेक्षा गाेपालन हा अनेक पटींने उपयाेगी उपक्रम आहे, हे पाश्चात्य लाेकांना पटवून देण्यास आता आरंभ झाला आहे. हळूहळू त्यांचेही परिणाम दिसू लागतील.
 
एर,_1  H x W: 0
 
काॅलर अ‍ॅप तयार करणाऱ्या अमेरिकेतील एबीएस ग्लाेबल या कंपनीचे भारतातील प्रमुख अरविंद गाेैतम यांनी सांगितले की, या काॅलरचा उपयाेग ते जनावर विकत घेण्याच्या आधीपासूनच सुरू हाेताे. सामान्यपणे अशी गाय विकत घेताना माेठी किंमत माेजावी लागते.त्यामुळे अधिकाधिक व्यवस्थित माहिती मिळणे याची आवश्यकता असते.त्या गाईची प्रकृती, तिची वेते, तिचे आधीचे तीन चार वंश, दूध देण्याची क्षमता त्यापूर्वी हाेऊन गेलेल्या व्याधी यांची माहिती मिळते. त्याला क्विक रिस्पाँस काेड म्हणजे क्यूआर म्हणतात, तसेच जगात काेणत्या देशात गाईबाबत काय परिस्थिती आहे, याचा अंदाज घेता येताे. भारतीय गाईंना दुधाच्या व्यवसायाच्या दृष्टीने जगातील दारे अजून माेकळी झालेली नाहीत. या काॅलरच्या निमित्ताने ते हाेणार आहे.ऑस्ट्रेलियातील स्माक्स्टेक या कंपनीने अशाच स्वरूपाची एक काॅलर गाईच्या पाेटाला जाेडली आहे. त्यामुळे गाईच्या शरीरातील तापमान, अ‍ॅसिडिटीअल्कली स्थिती, तिच्या हालचाली आणि प्रामुख्याने ती हीटवर आल्यावरची स्थिती याची माहिती मिळते. प्रामुख्याने ते जनावर चारा काेणता खात आहे आणि किती खात आहे, यावर लक्ष ठेवणे महत्त्वाचे असते.त्यासाठी अमेरिकेतील नाॅर्थ टेक्नाॅलाॅजीज मेकर आणि केंब्रीज इंडस्ट्रियल डिझाईन यांनी केलेली काॅलर प्रभावी आहे.गाेपालनाच्या क्षेत्रात नेहमीच दाेन प्रकारचे तंत्रज्ञान वापरले जाते. एक म्हणजे गाईने अधिक दूध द्यावे म्हणूनचे तंत्र आणि दुसरे गाईचे अधिकाधिक मांस मिळावे म्हणूनचे तंत्र. आि्रकेत, दक्षिण अमेरिकेत आणि ऑस्ट्रेलिया खंडात अनेक देशांची अर्थव्यवस्था ही गाेमांसावर आहे. कमी खर्चात गाय कशी पाळली जावी, हा उद्देश असताेच, पण दहा वर्षांपर्यंत तिचे दूध घेतले जाते व नंतर ती स्लाॅटर हाऊसला पाठविली जाते.या दाेन्ही दृष्टीने काम करणाऱ्या अनेक युनिव्हर्सिंटीज जगात आहेत. गाय जेव्हा विते तेव्हा तिची काळजी घेतली नाही, तर फार नुकसान हाेते. म्हणून त्या विणे तंत्राची काळजी घेणारे एक अ‍ॅप मिनिसाेटा येथील काॅलेज ऑफ व्हेटरनरी मेडिसीनची विद्यार्थिनी लिब्बी मार्टिन हिने शाेधून काढले आहे. ते गाईच्या पाेटाला लावले जाते. ते अ‍ॅप त्या गर्भाची स्थिती, काही अडचणी असल्यास त्याची स्थिती, विण्याची वेळ सांगते. गर्भातील वासराची स्थिती नीट नसल्यास ते मशीन डाॅक्टरांना त्याची माहिती कळवते.
 माेरेश्वर जाेशी, 9881717855