कॅटल अ‍ॅपमुळे उत्पादनात दाेन ते अडीचपट वाढ

    15-Feb-2021   
Total Views |
भारत हा जगातील सर्वांत माेठा दूध उत्पादक बनण्याची शक्यता आहे.या तंत्रज्ञानाचा सर्वांत अधिक फायदा गाई सांभाळणाऱ्या दूध व्यावसायिकांना हाेणार आहे.
 
as_1  H x W: 0
 
भारतात प्रथम जेव्हा पेजर आणि माेबाइल आले तेव्हा मेसेजला दहा रुपये आणि फोनला शंभर रुपये पडत असत.तेव्हाचे शंभर रुपयेही महाग हाेते, पण आता सारे सर्वसाधारणपणे परवडणारे झाले आहे. तीच जनावरांच्या माेबाइल काॅलरची स्थिती राहणार आहे.देशात सध्या दरवर्षी पंधरा काेटी पंचावन्न लाख टन दूध उत्पन्न हाेते.पुढील सहा वर्षांत नवी तांत्रिक सुविधा न बसविताही ते दीडपट वाढण्याची शक्यता आहे, पण काॅलर माेबाइल आला तर ही उत्पादकता अजून दाेनपट वाढू शकते. तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांचे आराेग्य रक्षण आणि गाईंचा दूध न देण्याचा काळ कमी करणे शक्य हाेईल.हे काॅलर सेन्सरचे तंत्रज्ञान हाताशी आले की, गाई-म्हशींकडून काेणत्या पद्धतीने पुढचे वेत घ्यावे, याबाबतचाही विचार करता येणार आहे.एखादा गुराखी जेव्हा काही जनावरे घेऊन ती चरायला घेऊन जाताे, तेव्हा प्रत्येक गाई-म्हशीची स्थिती त्याला त्याच्या माेबाइलवर कळणार आहे.हे साॅफ्टवेअर वेटवेअरने तयार केलेले आहे. ही माहिती घेण्याची सुरुवात आहे.अजून प्रत्येक जनावराची क्षमता, त्याची किती वेते हाेऊ शकतील याबाबतचा तज्ज्ञांचा अंदाज, त्या त्या जनावराच्या प्रकृतीनुसार पुढे हाेऊ शकणारे राेग, त्याचप्रमाणे साथीच्या राेगाची शक्यता यांचा निर्णय घेता येईल. चितळे यांनी प्रत्येक गाईची गेल्या दहा पिढ्यांची माहिती तयार ठेवली आहे. त्याचा त्यांना पुढील वासरे कशी असावीत, याबाबत निर्णय घेताना उपयाेगी पडते.हा प्रयाेग प्रत्येक उपयाेगी जनावराबाबत करता येणार आहे.याबाबतचा चितळे उद्याेग समूहाचा अनुभव असा की, गाईंच्या संख्येत ारसा बदल न करता तीन वर्षांपूर्वी त्यांचे दरराेजचे साडेतीन लाख लिटर दूध येत असे. तेथे आता साडेसात लाख दूध येते. चेन्नईच्या हॅटसन डेअरीनेही हे तंत्रज्ञान स्वीकारले आहे. हे तंत्रज्ञान सध्या फॅक्टर डेलीच्या वतीने करण्यात येत आहे.
 माेरेश्वर जाेशी, 9881717855