सध्याच्या काळात माेबाइलने प्रत्येकाचे जीवनच बदलून टाकले आहे. एवढ्या अधिक प्रमाणात माेबाइल वापरणे याेग्य की अयाेग्य, यावर विचार करायला माणसाला सवडच राहिलेली नाही. जी-5 आल्यावर तर ताे वापर अधिक वाढणार आहे.
गाेपालन, शेती आणि दूध व्यवसाय हे क्षेत्रही त्यात आले, पण माेबाइल न वापरण्याचा निश्चय करून ताे अपरिहार्यपणे वापरायला लागणे याचे सध्या पुढे आलेले उदाहरण म्हणजे लहान मुलांनी माेबाइल वापरणे. वर्षापूवीं अनेक घरांतून अशी स्थिती असायची की, नव्या पिढीच्या हातात ही अशी उपकरणे नकाेत म्हणून अनेक मातांनी आपल्या मुलांना माेबाइलला हात लावायलाही बंदी केली हाेती, पण काेराेना काळात ऑनलाइन शिक्षण सुरू झाल्याने सारे अपरिहार्य झाले आहे. ती जर त्या काळाचीच अपरिहार्यता असेल, तर त्याचे सध्यापासूनच व्यवस्थित शिक्षण हे आवश्यक ठरणार आहे.माेबाइलच्या मदतीनेच मर्यादित स्वरूपात रिमाेट कंट्राेलने काही उपाययाेजनाही करता येणार आहेत.कारण 5-जी पाठाेपाठ आर्टििफशियल इंटेलिजन्सच्या सुविधा येत आहेत.जनावरांच्या शरीरावर बसवलेल्या सेंसर्समधून त्यांना आज्ञा देता येतील का आणि त्या ते प्राणी पाळतील का, हा त्यातील कळीचा मुद्दा राहणार आहे.सकृतदर्शनी ते शक्य आहे. या अॅपच्या माध्यमातून पहाटेपासूनच ती जनावरे प्रसन्न कशी ठेवता येतील, यावर सध्या काम सुरू आहे. या जनावरांना संगीत आवडते का आणि आवडल्यास काेणते आवडते यावर प्रयाेग सुरू आहेत. काही ठिकाणी त्यावरील प्रयाेग यशस्वी झाले आहेत. त्यांच्या आहाराचा क्रम काय असावा, प्रामुख्याने धार काढण्यावेळी ती अधिकाधिक प्रसन्न असू शकेल, अशा पद्धतीने याचे प्रयाेग सुरू आहेत.धारेच्याआधी जाे पाैष्टिक आहार दिला जाताे, त्यात वारंवार चवीमध्ये बदल आणि निरनिराळे घटक वापरण्यात येत आहेत.अलीकडे माेठ्या डेअरींमधून एकाचवेळी शंभर शंभर गाईंच्या धारा काढण्याचे काम मशीनने सुरू असते.एका माेठ्या चक्राकार रिंगवर गाई उभ्या असतात आणि धारा निघत असताना ताे गाेल फिरत असताे. त्याचा परिणाम असा हाेताे की, त्या बदलत्या गतीशी समरूप हाेऊन त्या दूध अधिक देतात. हा प्रयाेग भारतात सुरू झाल्याची माहिती नाही, पण डिजिटल आयडेंटििफकेशन मशीन्स आली आहेत. जेथे शंभरपेक्षा अधिक जनावरे आहेत त्या ठिकाणी गाई ओळखणे कठीण असते. गाईच्या कानावरील क्रमांकामुळे ते काम मशीन करतेच, पण त्या जनावराला काहीसा पर्सनल टच देण्याच्या दृष्टीने एकेका व्यक्तीने अमूक दहा गाईंना व्यक्तिगत खरारा करायचा असे जे नेमून दिले जाते, त्यात आपल्या गटातील गाय काेणती हे ओखळावेच लागते. त्यात काेणत्याही कंपनीत चेहऱ्याचा डिजिटल फोटाे घेतलेला असताे, ताेच प्रकार डेअरी क्षेत्रात येत आहे.
माेरेश्वर जाेशी, 9881717855