या वर्षी पाकिस्तानचे गायवर्ष, तर चीनचे बैलवष

    12-Feb-2021   
Total Views |

w_1  H x W: 0 x
 
गेल्या पाच-सहा वर्षांत गाेविज्ञानाचे फायदे पुढे आल्यावर हळूहळू शेजारच्या देशातही या संदर्भात जागृतीचे नवे युग सुरू झाले आहे.
 
पाकिस्तानात सध्याचे वर्ष हे गायवर्ष म्हणून मानले जात आहे, या बातमीपाठाेपाठ चीनमध्येही विद्यमान वर्ष हे बैलवर्ष म्हणून मानले जात असल्याचे वृत्त आले आहे. या वर्षाचा पहिला दिवस आज म्हणजे दि.12 फेब्रुवारी राेजीच आहे. हा सारा भाग बाैद्ध संस्कृतीशी निगडित आहे.त्या निमित्ताने चीनने एक नाणेही जाहीर केले आहे. पाकिस्तान आणि चीन येथील ही वर्षे मानण्याची कारणे भिन्न आहेत.गेल्या पाच-सहा वर्षांत गाेविज्ञानाचे फायदे पुढे आल्यावर हळूहळू शेजारच्या देशातही या संदर्भात जागृतीचे नवे युग सुरू झाले आहे. भारतात गाईला गाेमाता मानतात. त्या दृष्टीने पाकिस्तानात मान्यता मिळालेली नाही, पण भारतात अनेक ठिकाणी गाेविज्ञानातून इंधन निर्माण करण्याच्या बातम्या येत गेल्या, त्यातून पाकिस्तानला ती जाग आली आहे. पाकिस्तानच्या वायव्य भागातील खैबरखिंड, पश्तुन क्षेत्र आणि पेशावर या भागातून पाकिस्तान संसदेवर निवडून आलेल्या झरताज गुल यांच्या पुढाकाराने हे शक्य झाले आहे. छत्तीस वर्षांच्या झरताज या पर्यावरण राज्यमंत्री आहेत. पाकिस्तानातून दरराेज साडेतीन काेटी किलाे शेण आणि गाेमूत्र समुद्रात वाहून जाते, त्याच्या आधारे गाेबर गॅस केला, तर एका बाजूला इंधन मिळेल आणि दुसऱ्या बाजूला जैविक शेती हाेईल, असा अहवाल त्यांनी नॅशनल असेंब्लीत मांडल्याने गायवर्ष पाळण्यास हाेकार मिळाला आहे.चीनमध्ये नव्या वर्षाचा महाेत्सव एक आठवडा चालताे. येथे आपल्यासारखी गुढीपाडव्याची कल्पना नसली, तरी राेषणाई मात्र प्रचंड असते. चीनमधील बैलवर्ष पाळले जाण्याचे कारण एकदम भिन्न आहे. भारतातील गाेआधारित शेती आणि एनर्जी याबाबत जागृती आल्याने तेथेही गाययुग सुरू झाले आहे, ही वस्तुस्थिती आहे. पण तेथे बैलवर्ष सुरू हाेण्याचे कारण तेथील पंचांगातील उल्लेख हे आहे. हा विषय फक्त चीनपुरताच मर्यादित नाही.काेरिया, जपान, लाओस, कंबाेडिया, व्हिएतनाम, थायलंड येथेही हे बैलवर्ष पाळले जाते.सध्या पूर्व आशियातील चीनबराेबर जपान, काेरिया या देशांतही औद्याेगिकता सुरू झाल्याने पंचांगाचे महत्त्व कमी झाले आहे. त्या तुलनेत आग्नेय आशियात म्हणजे थायलंड, कंबाेडिया, म्यानमारमध्ये हे पंचांग गांभीर्याने घेतले जाते. हे पंचांग बऱ्याच अंशी भारतीय पंचांगावरून घेतले आहे. आपल्याकडे काही राशी आणि काही नक्षत्रे यांची नावे ही निरनिराळ्या प्राण्यांचीच आहेत, त्याचप्रमाणे त्यांचीही बारा वर्षांची नावे ही बारा प्राण्यांचीच आहेत.
 माेरेश्वर जाेशी, 9881717855