सुदानमधील मुंदारी समाजातही गाईला गाेमाता मानले जाते

    10-Feb-2021   
Total Views |
साऱ्या आि्रकेत जी स्थिती आहे तीच सुदानमध्ये किंवा मुंदारी समाजातही आहे, ती म्हणजे गाईंच्या कळपाचे संरक्षण रात्रंदिवस करावे लागते.तेथे गाय हीच संपत्ती मानली जाते. सारे व्यवहार गाईच्या बदल्यात हाेतात.
 
डग._1  H x W: 0
 
भारताबाहेर गाईला देव मानणारा म्हणजे मातृदेवता मानणारा आणि त्यांची प्राणापलीकडे जपणूक करणारा समाज म्हणजे आि्रकेतील मुंदारी समाज.त्याची कारणेही तेवढीच महत्त्वाची आहेत. मुंदारी हा समाज सुदानमध्ये दक्षिणेकडे राहताे. गेली अनेक वर्षे हा समाज स्वातंत्र्यासाठी लढताे आहे.इ.सन 2006मध्ये त्यांना स्वातंत्र्य मिळाले. साऱ्या आि्रकेत जी स्थिती आहे तीच सुदानमध्ये किंवा मुंदारी समाजातही आहे, ती म्हणजे गाईंच्या कळपाचे संरक्षण रात्रंदिवस करावे लागते. तेथे गाय हीच संपत्ती मानली जाते. सारे व्यवहार गाईच्या बदल्यात हाेतात.येथील गाय हा त्या देशाचा आत्मा आहे. तेथे अंकाेले वातुसी जातीची गाय बघायला मिळते. तिची शिंगे फारच माेठी असतात आणि डाैलदारही असतात. त्या गाईलाही छाेटे वशिंड असते. त्या गाईचे अन्य सारे गुणधर्मही भारतीय गाईसारखे आहेत. त्या गाईची सर्वसाधारणपणे उंची सात फुट ते आठ ूट असते. गाय मारणे हे त्या समाजात पाप समजले जाते.
तेथे गाईच्या दुधाचा उपयाेग पवित्र वस्तू म्हणून केला जाताे, त्याचप्रमाणे गाेमूत्राचा उपयाेगही श्रद्धेने केला जाताे.त्या देशातील दुष्काळ ही माेठी समस्या आहे. उन्हाचे तापमान पन्नास अंश सेल्सियसच्या पुढे जाणे, ही तेथे वारंवार घडणारी प्रक्रिया आहे. अशावेळी गाईचेही उष्णतेपासून संरक्षण करावे लागते. त्यासाठी एक विशिष्ठ पद्धतीची राख गाईच्या अंगाला फासली जाते.तशाच स्वरूपाची एक राख हे मुंदारी स्वत:च अंगालाही असतात. गाय मेल्यानंतरचे विधी अतिशय दु:खपूर्ण असतात. गाईवरील हल्ले ही तेथील माेठी समस्या आहे.दहा दहा गटांचे चार पाच हजार गाेवंश एकाच ठिकाणी ठेवून त्यांच्यावर अ‍ॅटाॅमेटिक रायफलने पहारा देणे, हा त्या लाेकांचा महत्त्वाचा उद्याेग हाेऊन बसला आहे. या टाेळ्यांतील काेणी व्यक्तींनी काही गुन्हा केल्यास त्याची शिक्षा ही गाईंच्या संख्येत द्यावी लागते. एकविसाव्या शतकातही तेथे एका लग्नासाठी मुलीच्या बापाला दाेनशे गाेवंश एवढा हुंडा द्यावा लागताे. मुंदारी समाजाप्रमाणे सेस्टसवाना या समाजातही गाय ही देव मानली जाते.
 माेरेश्वर जाेशी, 9881717855