परदेशी खतांचे आक्रमण आणि बियाणांचे आक्रमण याबाबत भारतातील उदाहरण बघायचे झाले, तर ते बिल गेटस् यांच्या उदयाच्या आधीपासून सुरू आहे.
(भाग :1526)
भारतात आलेली रासायनिक खते, कीटकनाशकांचे प्रकार, बीटी काॅटनचे प्रकार, अन्य जेनेटिकली माॅडिाईड बियाणे, खते आणि कीटकनाशके यांचा बियाणातच जेनेटिकली माॅडिाईड तंत्राने समावेश करून ते गरीब देशात पाठवायचे, हा त्यातला पहिला टप्पा आहे. भारतापेक्षा आि्रकी देशांची स्थिती दयनीय आहे. दहा वर्षांपूर्वी दुष्काळ पडलेल्या आि्रकी देशात प्रचंड पीक येण्याच्या आकर्षणाखाली जाे प्रकार झाला, त्यांची स्थिती आज कल्पनातीत हालाखीची आहे. या विषयावर जागतिक कीर्तीच्या पर्यावरण तज्ज्ञ डाॅ. वंदना शिवा यांची काही पुस्तकेही आहेत आणि यूट्यूबवर भाषणेही आहेत. वंदना शिवा या वैदिक शेतीच्या पुरस्कर्त्या आहेत.
एका बाजूला मायक्राेसाॅफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेटस् यांचे सध्या अनेक देशांशी करार सुरू असतात. जगातील प्रत्येक साक्षर माणसाला ते नाव माहीत आहे. त्यांच्या अब्जावधी डाॅलरच्या सामाजिक कार्यातून आपल्या देशातील काेणत्या ना काेणत्या कामास मदत मिळावी, असे अनेकांचे प्रयत्न सुरू असतात.
त्यामुळे त्यांच्याशी झालेला करार म्हणजे ते आक्रमण करायला आले आहेत, असे सर्वसाधारण माणसाचे मत नसते. त्याचप्रमाणे त्यांच्याकडे असलेल्या प्रगत संगणक यंत्रणेतून गेल्या दहा-पंधरा वर्षांत माेठमाेठे धाेके दर्शविले आहेत, त्यातील महत्त्वाची पूर्वसूचना म्हणजे चीनमधून प्राण्यापासून निघालेली महाभयंकर राेगाची साथ. इ.सन 2020 मध्ये साऱ्या जगाला फार माेठी किंमत माेजायला लावणार आहे, हे विधान त्यांनी इ.सन 2015 मध्ये केले हाेते.एवढेच नव्हेतर प्रत्यक्ष काेराेनाची साथ सुरू झाल्यावर साधारणपणे फेब्रुवारी ते एप्रिल 2021 दरम्यान साऱ्या जगात त्याचा वीसपट प्रभाव वाढणार आहे, ही बाबही त्यांनी सहा, आठ महिने अगाेदर सांगितली हाेती. ही अशी विधाने त्यांनी विकसित केलेल्या अतिशक्तीच्या सुपर काॅम्प्युटरमुळे करता येतात.त्यामुळे अशा लाेकांबाबत जनमनात एक आदराची भावना असते. त्यामुळे त्याच्या प्रतिमेच्या वर्चस्वावर हे कार्यक्रम यशस्वी केले जातात