भारतात गाेआधारित शेतीचे नवे युग सुरू हाेत असताना त्यात विदेशी शक्तींना हस्तक्षेप करण्यास देणे धाेकादायक ठरण्याची शक्यता आहे (भाग :1525)
केंद्र सरकारचा पशुपालन विभाग आणि जगात संगणकक्षेत्रात नवे युग सुरू केलेले बिल गेटस् यांचा एक ट्रस्ट यांच्यामध्ये भारतातील पशुधन विकासाबाबत एक सामंजस्य करार म्हणजे एमओयू झाला आहे. त्यामुळे देशातील धान्य उत्पादन आणि पशुविकास यांचा विकास व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.देशातील अन्नधान्याची गुणवत्ता आणि उत्पादकता वाढण्याचा जेव्हा करार हाेताे, तेव्हा त्याबाबत सकारात्मक भूमिका घेणे आवश्यक आहे. अशी सर्वसाधारण भूमिका असली, तरी गेल्या पंचवीस वर्षातील युराेपातील बहुराष्ट्रीय कंपन्या आणि प्रामुख्याने बिल अॅण्ड मेलिंदा गेटस् ट्रस्टने आि्रकेतील दुष्काळ हटविण्यासाठी जी बियाणे आणि रासायनिक खते आणली त्यातून आि्रकेतील शेती अधिक उद्ध्वस्त झाली आहे. बिल गेटस् यांनी जगातील तिसऱ्या जगाबाबत म्हणजे दीडशेहून अधिक गरीब देशात त्यांच्या ट्रस्टचे असे प्रयाेग सुरू आहेत. हे काम जरी बिल गेटस्च्या नावावर असले, तरी त्याचा उपयाेग पाश्चात्त्य महासत्तांना झाला आहे.
दुसऱ्या बाजूला आि्रकी देशात पहिल्या दाेन वर्षात दुप्पटीपेक्षा अधिक उत्पादन आले; पण ती याेजना गरीब देशांना लांब पल्ल्याच्या दृष्टिकाेनातून अतिशय घातक ठरली आहे. जगात ‘थर्ड वर्ल्ड’ म्हणून जी दीडशे गरीब देशांची यादी आहे, तेथील जाणकारांनी बिल गेटस्चे वर्णन ‘दुसरा काेलंबस’ असे केले आहे. सव्वापाचशे वर्षांपूर्वी ख्रिस्ताेफर काेलंबसने अमेरिका शाेधली आणि त्याच्या पाेठापाठ युराेपने साऱ्या जगावर साम्राज्य सुरू केले. कांही वर्षांपूर्वी ते बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या मदतीने या बाबी करत असत. आता आयटी इंडस्ट्रीची जगाला जी आवश्यकता आहे, त्या माध्यमातून आणि नव्याने विकसित हाेणाऱ्या ‘आर्टििफशयल इंटेलिजन्स’ या माध्यमातून हाेत आहे. तंत्रज्ञानाची गरज या अपरिहार्यतेतून बिल गेटस् युराेपअमेरिकी महासत्ता जगातील दीडशेहून अधिक गरीब देशांचा ताबा घेत आहेत.भारतात गाेआधारित शेतीचे नवे युग सुरू हाेत असताना त्यात विदेशी शक्तींना हस्तक्षेप करण्यास देणे धाेकादायक ठरण्याची शक्यता आह