इंग्लंडमधील ‘साेमरसेट काऊ फार्म’ मध्ये एका गाईला ‘मॅड काऊ डिसीज’ झाल्याने त्या देशातील पशुवैद्यक यंत्रणा त्रस्त झाली आहे. इंग्लंडपाठाेपाठ ब्राझील देशातही दाेन गाईना हा राेग आढळला आहे. (भाग :1524)
हे लक्षात येताच त्या देशाने चीनला जाणारी त्यांची गाेमांसाची निर्यात राेखली आहे. ब्राझीलवरून जगातील पन्नास देशांना गाेमांस निर्यात हाेते. तरी सर्वच आघाडीवर त्यांनी आणीबाणी जाहीर केलेली नाही.कारण बहुतेक भागातील निर्यात ही अधिकृत व्यापारी करारानुसार नसते. दाेन वर्षापूर्वीही ब्राझीलमधील एका गाईमध्ये हा प्रकार आढळल्यावर त्यांनी चीनची निर्यात राेखली हेाती.मॅड काऊ डिसीज हा गाय- बैलांना हाेणारा राेग आहे. ताे प्रामुख्याने त्या जनावरांच्या मध्यवर्ती मज्जारज्जू संस्था यावर परिणाम करताे. त्याचप्रमाणे त्या जनावरांचे मांस खाणाऱ्या माणसावरही परिणाम हाेताे. माणसाच्या मध्यवर्ती संवेदना यंत्रणेलाच हानी पाेहाेचल्याने ते त्याचे आयुष्याचे दुखणे हाेऊन बसते.काही वर्षापूर्वी या राेगाने युराेपमध्ये काहूर माजवले हाेते.
सध्या एक गाय त्या व्याधीने मेल्याचे लक्षात येताच जागतिक पातळीवर काम करणाऱ्या ‘द अॅनिमल अॅँड प्लॅनेट हेल्थ एजन्सी’ यांनी जगातील गाेमांस खाणाऱ्या देशांना यावर लक्ष ठेवण्याचा इशारा दिला आहे. या आजाराचे सध्या तरी अन्य देशांच्या पातळीवर काेणताही धाेका नाही.तरीही आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. कारण सध्या प्राण्यांपासून पसरलेल्या काेराेनासारख्या महाभयानक जागतिक महामारीने सारे जग त्रासले आहे. म्हणून एका गाईला तरी ही व्याधी का झाली, याची कसून तपासणी करण्यात येत आहे, अशी माहिती अॅनिमल अॅण्ड प्लॅनेट हेल्थ एजन्सीच्या पशुतज्ञ ख्रिस्तिनामिडलमिस यांनी दिली. या व्याधीला शास्त्रीय नाव बाेविन स्पाॅन्जीाॅर्म एन्सेलाॅपॅथी म्हणजे मॅड काऊ डिसीज असे म्हटले जाते.आम्ही सध्या त्या परिसरातील काअू ार्म म्हणजे गाेशाळांची ारच काळजी घेत आहाेत. यापूर्वी इ.सन 2014 मध्ये ब्रिटनमध्ये पाच गाई या राेगाने मेल्या हाेत्या. हा राेग प्रथम इ.सन 1980 मध्ये इंग्लंडमध्येच आढळला हाेता आणि तेथून ताे युराेपभर पसरला हाेता