गायीसाठी प्रेमचंद बंदुकीची गाेळी झेलायला तयार झाले हाेते

    06-Oct-2021   
Total Views |
 
 
शंभर वर्षापूर्वी गाेधनाविषयी जाणकारांच्यात काय भूमिका हाेती हे सुप्रसिद्ध हिंदी कादंबरीकार मुन्शी प्रेमचंद यांच्या आयुष्यातील एका प्रसंगावरून स्पष्ट हाेते. (भाग :1523)
 
 

cow_1  H x W: 0 
 
सुमारे शंभर वर्षापूर्वीची ही गाेष्ट आहे. प्रेमचंदजी गाेरखपूर येथे अध्यापक म्हणून काम करत हाेते. गाेरखपूर हे शहरच नवनाथांच्या काळापासून गाेपूजेसाठी ओळखले जाते. घराेघरी गाय असणे आणि गायीची पूजा हाेणे हा तेथील नित्यक्रम आहे. मुन्शी प्रेमचंद यांनीही घरी गाय पाळली हाेती. एके दिवशी नकळत गाय दावे साेडून बाहेर पडली आणि काही अंतरावर असलेल्या इंग्रज जिल्हा कलेक्टरच्या बंगल्यात गेली. ती गाय आल्याने त्या जिल्हाधिकाऱ्याचा संताप अनावर झाला आणि ताे बंदुकीत गाेळ्या भरतच बाहेर आला.
 
‘तुमच्यासारख्या काळ्या लाेकांना बंदुकीचीच भाषा समजते. येथे आम्ही राज्य चालवायला आलाे आहेत. आमचा अधिक्षेप म्हणजे ब्रिटिश साम्राज्याचा अधिक्षेप असे आम्ही मानताे. माझ्या घराभाेवतालच्या बागेत गाय साेडायची तुझी हिंमत कशी झाली ?’ असे गर्जतच ताे कलेक्टर बाहेर आला. मुन्शी प्रेमचंदने त्याला समजावयाचा प्रयत्न केला की, ते जनावर चुकून तुमच्या बागेकडे वळले. पण यापुढे तसे हाेणार नाही, याची काळजी घेतली जाईल. यावेळी कृपया साेडून द्या.त्यावर त्या इंग्रज अधिकाऱ्याची एकच भाषा हाेती की, तुम्हा काळ्या इंडियन्सना फक्त गाेळीचीच भाषा समजते. तीच भाषा मी या गायीसाठी वापरणार आहे, असे म्हणून त्यांनी गायीवर निशाणा राेखण्यास आरंभ केला.
 
हे पाहिल्यावर मुन्शी प्रेमचंद ती गाय आणि ताे इंग्रज जिल्हाधिकारी यांच्या मध्ये जाऊन उभे राहिले आणि म्हणाले, ‘तुम्हाला गाेळी चालवायचीच असेल तर ती माझ्यावर चालवा. त्यासाठी मी काेणतीही किंमत माेजायला तयार आहे.’ मुन्शीजींचा हा अवतार पाहिल्यावर ताे जिल्हाधिकारीही नरमला आणि बंदुकीची नळी खाली करून बंगल्यात निघून गेला.गाेवंश या विषयावरील ‘गाे-दान’ ही कादंबरी गाजलेली तर आहेच; पण प्रेमचंद यांच्या दहा कादंबऱ्यात गायीच्या गाैरवाचे संदर्भ आले आहेत. ते त्यांचे चिंतन किंवा जीवनदृष्टी इंग्रज कलेक्टरने गायीवर बंदूक राेखली असताना ताे घाव स्वत:वर झेलण्याचा निर्णय घेण्याच्या भूमिकेने अधिक स्पष्ट झाली.