आयुर्वेदाच्या दृष्टीने असे काही पदार्थ आहेत ते दुधाबराेबर घेणे कटाक्षाने टाळावे. त्यात सर्वात प्रथम म्हणजे दूध-केळे किंवा शिकरण कटाक्षाने टाळावी. त्यामुळे पचन क्रिया थाेडी थाेडी कमकुवत हाेत जाते. (भाग :1522)
केळ्याबरेबरच चेरी, लिंबू, द्राक्षे, चिंच, आवळा, अननस अशा पदार्थांचा समावेश आहे. खमीरपासून केलेले पदार्थ(यीस्ट) याचे कण येवढे सूक्ष्म असतात की, एका ग्रॅममध्ये वीस अब्ज असतात. ते स्वतंत्र आहारासाठी पाेषकही असतील पण दुधाबराेबर घेऊ नयेत, काेणत्याही मांसाहारी पदार्थाबराेबर दूध कटाक्षाने टाळावे, दह्याबराेबरही दूध टाळावे. मसालेदार पदार्थ, काेणत्याही फळाबराेबर दूध टाळावे.त्याचबराेबर मूळ जातीच्या वनस्पती आणि फळे यांच्याबराेबरही दूध घेणे टाळावे.दुधात मध घालून घेणे शरीराला पाेषक ठरते. त्याचप्रमाणे गूळही दुधाबराेबर चालताे. पण अश्वगंधा या औषधीबराेबर मात्र दूध घेऊ नये.
दैनंदिन आहारात आपण दूध वापरतच असताे. पण अशा काही वनस्पती आहेत की त्याही दैनंदिन आहारात वापरता येतात.त्यामुळे आजारपण दूर पळते. आपले एकूणच अन्न हे रासायनिक खतावर आलेले असते. त्यामुळे त्यात सूक्ष्म स्वरूपात विषांश असताेच. ताे दुरुस्त करण्यास आपणच थाेडासा अभ्यास करून करून आहारात त्याचा समावेश करावा. त्यासाठी वैद्यांचा सल्लाही घ्यावा. वर उल्लेख केलेली अश्वगंधा ही वनस्पती ही गेल्या दाेन वर्षांच्या काळात अतिशय उपयाेगी पडली आहे. ती प्रतिकारक्षमता तर वाढवतेच, पण काेराेना काळात सर्वांत अधिक त्रास झाला ताे मानसिक त्रास. ताे त्रासही अश्वगंधाने कमी हाेताे. त्यामुळे सर्दी नियंत्रणात राहते.
शरीरातील पांढऱ्या पेशी आणि लाल पेशीही सुदृढपणे वाढतात. कॅन्सर बरा हाेण्यासही त्याचा उपयाेग हाेताे. पण, त्याच्या जादा वापराने रक्तदाब, मधुमेह, हृदयाला त्रास हेही संभवते. त्यामुळे यांचा वापर जरूर करावा, पण वैद्यांच्या सल्ल्याने.दूध हे आहारातील अमृत आहे. पण ते आपल्यापर्यंत अमृत म्हणून पाेहाेचते की विष म्हणून पाेहाेचते हे आपल्याला माहीत नसते. त्यावर लक्ष ठेवले तर आपल्याला शुद्ध दूध उपलब्ध करणेही शक्य असते. गाेविज्ञान व गाेवैद्यक यांचा दैनंदिन जीवनातील वापर वाढवला तर फक्त आजारापासून मुक्ती मिळते असे नव्हे तर चांगल्या क्षमतेचे जीवन आपल्याला मिळते.