खेड्यातील दूध, दही चांगले असते; पण तिथून निघून आजच्या प्रगतीच्या मार्गावर येण्यासाठी आम्ही फार परिश्रम घेतले. तू एखादा छाेटासा प्रयाेग करावास; पण त्याला आयुष्य वाहून घेतलेस तर ‘एकदा खेड्यात जाशील आणि परत येणार नाहीस’ असा वडीलधाऱ्यांनी सल्ला दिला.(भाग :1544)
वैष्णवी सिन्हा इ.सन 2015 मध्ये भारतात परत आली. सिन्हा कुटुंबाची जमेची बाजू म्हणजे त्यांची ग्रेटर नाेयडा येथे चाळीस एकर जागा हाेती. हे काम सुरू करण्यासाठी तिने दाेन पद्धतीने कामाला आरंभ केला.एक म्हणजे तिच्या बहिणीचा मार्केटिंगचा व्यवसाय हाेता, त्यात तिने मदत करायला आरंभ केला आणि दुसऱ्या बाजूला दूध व्यवसायाची माहिती घेण्यास आरंभ केला. दुसऱ्या एका डेअरीार्मवर सर्व प्रकारचा सराव सुरू ठेवला. उत्तर भारतात परिचित गाई म्हणजे गीर, थारपारकर, साहिवाल, राठी, रेड सिंधी, हरियाणवी हे गाेवंश परिचित आहेत.पण, अभ्यासाने तिला कळून चुकले की, माेठमाेठ्या जनावरांच्या बाजारपेठातून जे वरील गाेवंश दाखवले जातात, त्यापैकी काेणताही गाेवंश शुद्ध नसताे. म्हणून तिने खेडाेपाडी हिंडून गाेवंश पाहून ठेवले. त्याच बराेबर बीजामृत, जीवामृत, अमृतपाणी कसे तयार करायचे याचे शिक्षण घेतले.
प्रथम भाज्या, वेल छाेट्या झुडपांची फळे हे पिकवण्यास आरंभ केला.दुसरीकडे दूध विक्रीचा अभ्यास सुरू केला. तिची ठाम भूमिका हाेती की, निरसे दूधच विकायचे. सध्याच्या पिशवीतून येणाऱ्या दुधाच्या तुलनेत निरसे दूध पाचपट उपयाेगी असते.पाश्चराईज दूध 130 अंश तापवून पूर्णपणे नि:सत्त्व झालेले असते, याची प्रात्यक्षिके दाखवली.अनेकांनी निरसे दूध मुलांना देणे सुरू केले. अडीचशे गाेवंश असणाऱ्या या गाेशाळेत एकही गाय गळ्यात दाेरी घालून बांधलेली नसते. त्यांना हवी ती वैरण, त्यात वाळलेली, ओली, बारीक केलेली डाळ यांचा समावेश असताे.सध्या त्यांच्या ‘शून्य फार्म’ची महिन्याची उलाढाल दहा लाख रुपयांची आहे. तिला अजून फार लांबचा पल्ला गाठायचा आहे.