250 गाेवंशाचा फार्म करणारी वैष्णवी सिन्हा

    28-Oct-2021   
Total Views |
 
 
जागतिक पातळीवर गाेल्फ खेळण्यात प्रावीण्य मिळवलेल्या दिल्लीजवळील नाेयडा येथील ‘वैष्णवी सिन्हा’ या गाेवैज्ञानिक शेतीचे आदर्श उदाहरण आहेत. (भाग :1543)
 

cow_1  H x W: 0 
 
कारण गाेआधारित शेती, गाेवैद्यक आणि पाश्चराईज न केलेल्या दुधाची म्हणजे निरशा दुधाची विक्री त्यांनी सुरू ठेवलेली आहे. त्यांच्याकडे आज अडीचशे गाेवंश आहे. त्यांच्या गाेशाळेला त्यांनी ‘शून्य फार्म’ नाव दिलेले आहे.शून्य याचा अर्थ त्यांच्या दृष्टीने एवढाच की, शून्य केमिकलचा वापर. दहा, पंधरा, किलाे शेण व गाेमूत्र यांचा वापर करून एक एकराची शेती कशी करायची याचे ते प्रत्यक्ष प्रशिक्षण देतात. त्यासाठी त्यांनी बीजामृत, जीवामृत, ब्रह्मास्त्र, शेतीला निरनिराळ्या समस्यांच्या वेळी उपयाेगी पडणारे अर्क त्यांनी विक्रीस तयार ठेवले आहेत. निरशा दुधाचा दर दीडशे रुपये आहे, तरीही मागणी सतत वाढत असते.
 
एकतीस वर्षाच्या या मुलीची कसलीही शेती किंवा दूधव्यवसाय यांची पार्श्वभूमी नाही. वडील आयएएस अधिकारी, स्वत:चे प्राथमिक शिक्षण नाेयडा येथे आणि पुढील शिक्षण अमेरिकेत न्यूयाॅर्क आणि शिकागाे येथे झालेले. आठ वर्षांपासून तिने गाेल्फमध्ये रस घेतला आणि त्यात प्रावीण्य मिळाले. आयुष्यात देशाची सेवा करण्याचे ध्येय तिने ठरवले.आईचे वडील-नाना-यांच्या गप्पांतून तिला ार प्रेरणा मिळाली. त्यांच्या लहानपणी शेती आणि शेतकरी कसा हाेता आणि अन्न पिकवणाऱ्या शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागत आहे, हे वाक्य तिच्या जिव्हारी लागले. त्यामुळे अनेक प्रश्न विचारून तिने आजाेबांना भंडावून साेडले.
 
त्यातूनच तिने गाेआधारित शेती करण्याचा निश्चय केला. साठ वर्षांपूर्वीपर्यंत या देशात देशी गाई हाेत्या आणि रासायनिक खते नव्हती. तेव्हाच्या स्थितीचा तिने अभ्यास सुरू केला. स्वत:चे महाविद्यालयातील शिक्षण ‘परड्यू’ विद्यापीठात सुरू हाेते, तरीही तिचा ओढा मात्र भारतासारख्या खंडप्राय देशाला विदेशी गाई आणि विदेशी रासायनिक खते यांच्या द्वारे उद्ध्वस्त केले जाऊ शकते, यावरील चिंतनाकडे हाेता.तिचे वडील आलाेक सिन्हा, घरचे अन्य वरिष्ठ यांना गाय, गावाकडील शेती याबाबत प्रेम हाेते; पण वैष्णवीने तिच्या शिक्षणाचे करिअर साेडून पुन्हा शेती करावी, याला मात्र विराेध हाेता.