दिवाळी निमित्ताने उत्तरेत गणेश व लक्ष्मी यांच्या शेणाच्या मूर्ती

    27-Oct-2021   
Total Views |
 
 
प्रयागराज जिल्ह्यातील बहारिया ब्लाॅकमधील विश्वहिंदू परिषदेच्या तरुण गटाने दिवाळीच्या वेळी त्या भागात लागणाऱ्या गणपती आणि लक्ष्मी यांच्या मूर्तींची निर्मिती गाईच्या शेणापासून तयार करण्यास सुरुवात केली आहे. (भाग :1542)
 

cow_1  H x W: 0 
 
पहिल्या टप्प्यात दहा हजार गणेशलक्ष्मी मूर्ती आणि पंचवीस हजार दिवे यांचा समावेश आहे. विहिंपचे स्थानिक कार्यकर्ते लाल मणी तिवारी यांनी सांगितले की, बहारिया भागातील ‘नाऱ्ही’ या गावच्या लाेकांनी या उपक्रमात पुढाकार घेतला.सध्या तेथे तेहेतीस महिला काम करत आहेत. हे काम प्रेम गाैशाला अनुसंधान ट्रस्टच्या वतीने हाेत आहे.उत्तर भारतात सर्वत्र दिवाळीच्या दिवशी गणेश व लक्ष्मीच्या मूर्तींच्या एकत्र पूजा करण्याच्या पद्धती आहेत आणि त्यासाठी काही काेटी अशा मूर्ती लागत असतात.उत्तर भारतात अनेक ठिकाणी असे प्रयाेग सुरू झाले आहेत आणि त्यांना यशही मिळाले आहेत.
 
यातील एक माेठा फायदा लक्षात आला आहे की, आजपर्यंत विजेच्या दिव्याचीच प्रथा पडली आहे. पण, गाईच्या शेणाचे दिवे लावले की, वातावरण अतिशय शुद्ध आणि प्रसन्न हाेते. त्याचा गाेशाळांना उपयाेगही हाेत आहे. वास्तविक या भागात दिवाळीच्या काळात सारी घरे ही गाईच्या शेणाने सारवली जात असतात. त्याची एक घरात प्रसन्नता असतेच. आता त्याला दिव्यांची माेठ्या प्रमाणावर जाेड मिळणार आहे. सध्या मूर्ती अणि दिवे हे ओले शेण आणि वाळलेल्या शेण्या मातीत मिसळून अशा दाेन्ही पद्धतीने केल्या जातात. शेणाचे दिवे अधिक शांतता देतात.हळूहळू गाईच्या शेणाचा दैनंदिनी गरजातील वापर वाढू लागला आहे.
 
शेणापासून खादी ग्रामाेद्याेगने रंग विकायला आरंभ केल्यापासून रंगाचेही मार्केट बदलले आहे. काेल्हापूरमधील एका गटाने शेणापासून चप्पल बनविल्या आहेत.त्यांचा असा दावा आहे की, शेणाच्या चपला पायाला अधिक गारवा देतात. घरात घालण्यासाठी तर त्या उत्तमच आहेत; पण बाहेर जाण्यासाठीही त्या चालतात.हरियानामध्ये शिवदर्शन मलिक यांनी गेली बारा वर्षे ‘वेदिक प्लॅस्टर’ संस्थेर्ते गाईच्या शेणाच्या विटा करून घरबांधणी सुरू केली आहे. ते प्रशिक्षणही देतात.