हैदराबादमधील जनावरांवर प्रेम करणाऱ्या एका गटाने 130 किमी अंतरावरील नालगाेंडा जिल्ह्यातील देवरकाेंडा या गावी जाऊन तेथील एका काठ नसलेल्या विहिरीत पडलेल्या गाईला वाचवले. (भाग :1541)
गाेआधारित शेतीपासून ते वैद्यकापर्यंत आणि पर्यावरण रक्षणापासून ते दुधाच्या आधारे तरुण पिढीच्या वाढत्या प्रतिभेपर्यंत भारतीय गाेवंशाचे महत्त्व जसे लक्षात येत आहे, त्यानुसार भारतीय गाेवंश वाचवण्याच्या प्रयत्नातही वाढ हाेत आहे.हैदराबादमधील या मंडळाच्या कार्यकर्त्यार्ंना ही बातमी सकाळी साडेदहा वाजता मिळाली. त्यांनी लगेचच आवश्यक ती साधनसामग्री घेऊन माेटारसायकलने नलगाेंडा जिल्ह्याकडे कूच केली. ही गाय नेनावत बाळू याच्या मालकीची हाेती. गाय काढायला येणाऱ्या चाैघांनी त्या शेतकऱ्याला एक ट्रॅक्टर किंवा जेसीबी आणून ठेवण्यास सांगितले.गाय त्या विहिरीतील पाण्यात निम्मी बुडाली हाेती. थंडीने आणि भीतीने ती कापत हाेती. रात्री पडलेली ती गाय सकाळपर्यंत तग धरू शकत नव्हती.
थंडीने ती बेशुद्ध पडण्याची शक्यता निर्माण झाली हाेती. दुसऱ्या बाजूला मदतीसाठी बाेलावलेले ट्रॅक्टरही चिखलात रुतून बसले हाेते. त्यातील अजून एक अडचण म्हणजे गाय अशक्त हाेती. तरीही तरुणांनी जिद्द बांधली आणि ते विहिरीत उतरले. गाईला थाेडा मसाज करून अंगात ऊब आणली आणि उभी केली. दाेरखंडने तिचे पाेट बांधून चारही बाजूंनी तिला उचलले. एक क्षण असा आला हाेता की, काठाच्या माेठ्या दगडांमुळे ती अडू लागली आणि वरच घेता येईना.अशा वेळी एकाने शक्कल लढविली आणि तिच्या समाेर तिचे दीड महिन्याचे वासरू उभे केले. ते वासरू पाहिल्यावर अचानक त्या गाईला बळ आले आणि विहिरीच्या काढावरील ताे माेठा दगड तिने सर्वशक्तीनिशी पार केला आणि वासराकडे धावली. या उपक्रमाचा फायदा असा झाला की, असा प्रसंग पुन्हा केव्हा घडला, तर त्याला लागणारी सामग्री लाेकांनी वर्गणी करून जमा करून ठेवली.