चीन आणि पाकिस्तान या देशांनी गाेवंश आणि अन्य प्राणी यांच्या विकासाच्या दृष्टीने लांब पल्ल्याचा सामंजस्य करार (एमओयू ) केला आहे. (भाग :1540)
पाकिस्तानचे अमेरिकेशी बिनसल्यावर चीनची मुत्सद्देगिरी पातळीवरील मैत्री वाढविली. त्याप्रमाणे पूर्वी अमेरिकेने पाकिस्तानला जवळ जवळ दत्तक घेतले हाेते. पण, नऊ-अकरानंतर ताे प्रकार संपला आणि पाकिस्तानने चीनला मित्र केले. सध्या तर चीनने पाकिस्तानला ‘दत्तक’ म्हणूनच सांभाळले आहे.गेल्या पंधरा वर्षांत चीनने पाकिस्तानशी अनेक करार केले. पण, गाेवंश विकासाचा करार हा गेल्या सहा महिन्यांतील आहे.कारण सध्या दाेन्हीही देशांत ‘गाय वर्ष’ आहे. पाकिस्तानने गाय वर्ष पाळले आहे.कारण प्रत्येक शेतकरी हा गाेधनावरच उभा राहू शकताे, अशी त्या देशाची खात्री झाली आहे. असे असले तरी गाेमांस निर्यात यात ताे नवनवीन संधी शाेधत आहे.
दुसऱ्या बाजूला चीनला माेठ्या प्रमाणावर गाेवंशही हवा आहे, दूधही हवे आहे आणि गाेमांसही हवे आहे. पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार पाकिस्तानमध्ये दूध देणाऱ्या गाईं-म्हशींची संख्या वीस काेटी एेंशी लाख आहे आणि दरवर्षी सहा काेटी टन दूध उपलब्ध हाेते.पण, चीन यातील काेणतेही पदार्थ घेण्यास तयार नाही. कारण तेथे जनावरांचा ‘माऊथ अॅण्ड फुड डिसीज’ आहे. जगातील निर्यातीची पाकिस्तानची हीच स्थिती आहे.त्यासाठी पाकमधील प्राणिजगताचे आराेग्य सुधारण्याचा आणि पाठाेपाठ ती उत्पादने खरेदी करण्याचा चीनने करार केला आहे.सध्या त्या कराराबाबत आरंभाची स्थिती आहे.
कारण पाकमधील आवश्यक त्या उत्पादनाचा दर्जा सुधारण्यासाठी काही काळ लागणार आहे. सध्या चीनमध्येमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला एक गांय देण्याचा कार्यक्रम सुरू आहे. तेथील गन्सू प्रांतात पाच काेटी गाई देऊन झाल्या आहेत. अर्थात त्या गाई तेथील ‘यलाे काऊ’ म्हणजे भारतीय मूळ वंशाच्या आहेत.अशाच पद्धतीने त्यांना शेतकऱ्यांना वीस काेटी गाेवंश द्यायचा आहे. दुसऱ्या बाजूला त्यांची गाेमांस व अन्य मांसाहारी पदार्थांची गरजही वर्षाला काही लाख टनांची असते.चीनमधील लाेकजीवनातील पंचांगानुसार हे वर्ष हे ‘वृषभ’ वर्ष आहे. त्यामुळे या काळात त्या सरकारने अधिकाधिक शेतकऱ्यांना गाेवंश देण्याचा संकल्प केला आहे. दाेन देशातील या करारात िफशरी, गाढवे