गाेविज्ञानामुळे चीनची एक लाख काेटींची आयात राेखली

    22-Oct-2021   
Total Views |
 
 
गाेउत्पादनांच्या माध्यमातून चीनमधून येणारी अजून एक लाख काेटी रुपयांची आयात कमी करण्याचा निश्चय केंद्र सरकारने केला आहे.सध्या भारत आणि चीन यांचे संबंध तणावाचे आहेत. (भाग :1537)
 

china_1  H x W: 
 
हिमालयाच्या क्षेत्रातील गलवान खाेऱ्यात दाेन्ही देशांच्या सेना एकमेकांसमाेर उभ्या आहेत. तरीही चीनची भारतातील आयात पाच लाख काेटी रुपयांची आणि निर्यात तीन लाख काेटी रुपयांची आहे. यांचे कारण जगातील अनेक देशांप्रमाणे हे दाेन्ही देश इ.सन 1992 पासून गॅट करार किंवा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनने बांधले गेले आहेत.भारतातील ग्राहकांचा विचार करून चीन येथे ारच माेठ्या प्रमाणावर ग्राहकाेपयाेगी वस्तू पाठवत असताे. भारतात सध्या चीनबद्दल नाराजी आहे, हे लक्षात घेऊन चीन ‘मेड इन व्हिएतनाम’ असे शिक्के मारून निर्यात करत असताे.अशा अप्रत्यक्ष चिनी निर्यात करणाऱ्या देशांची संख्या दहा आहे.या संदर्भात ‘टीव्ही 9 भारतवर्ष’ यांनी दिलेल्या माहितीनुसार भारताने पंचगव्यावर आधारित तीनशे उत्पादनांची निर्मिती आणि निर्यात सुरू केली आहे. याला चीनमधूनही मागणी आहे.
 
त्या खेरीज शाेभेचे साहित्य ज्यात दिवे, मेणबत्त्या, धूप, अगरबत्ती, साम्बरानी कप, हार्डबाेर्ड, हवन सामग्री, त्याचप्रमाणे गणेश आणि देवी यांच्या मूर्ती यांचा समावेश आहे.अर्थात या साऱ्याची सुरवात गेल्याच वर्षी झाली हाेती. राष्ट्रीय कामधेनू याेजनेमधून त्याचे अनेक प्रयाेग झाले. अर्थात या साऱ्यात व्यापारी संघटनांची माेठी भूमिका आहे. काॅन्ेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स यांची माेठी भूमिका आहे.चीनच्या उत्पादनांना विराेध करणे आणि त्यांची जागा स्थानिक उत्पादनांनी भरून काढणे ही त्यांची भूमिका अतिशय उपयाेगी पडली आहे आणि त्यातूनच चीनला एक लक्ष काेटी रुपयांची आयात कमी झाली आहे. अर्थात त्यासाठी गाेविज्ञान प्रचारकांना मेहनत घ्यावी लागत आहे. चीनमधून येणाऱ्या वस्तूत अनेक घातक घटक असतात, यांची कल्पना दिल्यानंतर लाेक स्थानिक वस्तू घेण्यास मान्यता देतात.