महात्माफुले कृषी महाविद्यालयात देशी गाेवंश केंद्र

    21-Oct-2021   
Total Views |
 
 
एकशे चाैदा वर्षांंचा इतिहास असणाऱ्या पुणे अ‍ॅग्रिकल्चरल काॅलेजमध्ये प्रथमच देशी गाय विभाग सुरू हाेत आहे. या कृषी महाविद्यालयाची स्थापना इ.सन 1907 सालची आहे. (भाग :1536)
 
 

cow_1  H x W: 0 
एशी गाेवंशाच्या संवर्धनातून दूध आणि दुग्धजन्य याबाबत कार्यक्षमता वाढावी, या उद्देशाने ‘गाेवंश संशाेधन आणि प्रशिक्षण केंद्र साकारत आहे. पुणे कृषी महाविद्यालय हे महात्माफुले कृषी विद्यापीठाला संलग्न आहे. या केंद्रासाठी राज्य सरकार दाेन टप्प्यात एक काेटी 77 लाखांचा निधी देणार आहे.भारतात गाेवंशांची संख्या माेठी आहे, पण त्यांची दूध देण्याची क्षमता कमी असते, त्यामुळे शेतकरी देशी गाेवंश पालनापासून दुरावला आहे. असे असले तरी देशी गाेवंशाच्या दूध, गाेमूत्र आणि शेण यांच्या औषधी गुणधर्मामुळे त्यांची मागणी वाढत आहे. पण या दाेन्ही बाबींचा मेळ कसा घालायचा हे शेतकऱ्यांना समजत नसल्याने हा गाेवंश कसा पाळावा व त्याचे व्यवहारिक गणित कसे बसवावे, याचे प्रशिक्षण देण्याचा या केंद्राचा उद्देश आहे, अशी माहिती या प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डाॅ. साेमनाथ माने यांनी दिली.ते म्हणाले, देशातील विविध जातींच्या गाेवंशावर तुलनात्मक अभ्यास केला जाणार आहे. महाराष्ट्रातील हवामान लक्षात घेता काेणते गाेवंश येथे काय परिणाम देतात, याचा अभ्यास केला जाणार आहे.
 
पहिल्या टप्प्यात दहा गीर गाई, सहा रेड सिंधी गाई आणल्या असून टप्प्याटप्प्याने साहिवाल, राठी, थारपारकर हे गाेवंश आणले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात हा प्रकल्प पाच वर्षांचा असला, तरी मूळ नियाेजनात ताे दीर्घकालीन प्रकल्प म्हणून समाेर ठेवण्यात आला आहे.या केंद्राचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे येथे टेस्टट्यूब बेबी तंत्रज्ञानाच्या मदतीने गाेवंशाची पुढची पिढी तयार केली जाणार आहे. त्या संदर्भात राष्ट्रीय डेअरी डेव्हल्पमेंट बाेर्डाबराेबर करार करण्यात आला आहे.या केंद्राला कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ.
प्रशांतकुमार पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे. गेल्या दहा वर्षात पुणे विभागातील प्रत्येक गावात गाेआधारित शेतीचा प्रयाेग सुरू झाला आहे. आता जर म.फुले कृषी विद्यापीठांनी जर गाेवंश विकासाचा कार्यक्रम हाती घेतला, तर गाेआधारित शेती व गाेवैद्यक यात चांगली वाढ हाेईल.