अमेरिकेतील ‘ग्लाेबल जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च’या संशाेधन पत्रिकेत महेंद्रगड, उत्तर प्रदेश येथील नीरज आर्य यांचा ‘पंचगव्याचे उपयाेग’यावरील संशाेधन निबंध प्रकाशित झाला आहे. (भाग :1535)
त्यांनी यावरील सारे संशाेधन बंगळुरू येथील स्वामी विवेकानंद याेग अनुसंधान केंद्र येथे केले आहे. नीरज आर्य यांनी असे सांगितले की, पंचगव्याचे अनेक उपयाेग आहेत आणि ते निरनिराळ्या ग्रंथातूनही विशद केले आहेत. पण, दैनंदिनी जेवणात मर्यादित मात्रेत जर पंचगव्य वापरले, तर त्या व्यक्तीचे फक्त राेग बरे हाेतात असे नव्हे, तर प्रकृती अनेक अंगांनी सुधारते.जीवनाची गुणवत्ता आणि आध्यात्मिकता यात वाढ हाेते. सध्या शारीरीक, मानसिक आणि बाैद्धिक वाढ हाेण्यासाठी अनेक औषधे आणि टाॅनिक वापरली जातात. त्याने वाढ हाेतेही. पण ती वाढ अधिकाधिक आपल्या अपेक्षेने असते.
आपली अधिकतम वाढ किती हाेऊ शकते, याची आपल्यालाही कल्पना नसते. ती वाढ पंचगव्याने हाेते. अलीकडे अनेक कंपन्या तयार बाटल्यातून पंचगव्य तयार करून विकतात, त्यांचा उपयाेग हाेत नाही, असे नाही पण ताजे दूध, ताजे शेण आणि ताजे गाेमूत्र हे जर मिळाले तर त्याच्या आधारे पंचगव्य करून घेतले, तर त्याचा उपयाेग अनेक पटींनी हाेताे.नीरज आर्य यांचे म्हणणे असे की, पंचगव्य हे फक्त औषध किंवा धार्मिक विधीतील बाब यापुरते मर्यादित न राहता जगाला त्याचा आहार म्हणू परिचय करून दिला पाहिजे. पंचगव्य हा जगातील सर्वात सात्त्विक, स्वस्त आणि चांगला आहार आहे. जगाने ताे स्वीकारला, तर जगातील अनेक समस्या कमी हाेतील. नीरज आर्य हे महेंद्रगढ येथील केंद्रीय विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत.
पीएचडीसाठी त्यांचा विषय ‘याेग’ असा आहे.या विषयाच्या अभ्यासाची सुरुवात त्यांनी तमिळनाडू येथील पंचगव्य डिप्लाेमापासून विवेकानंद याेग अनुसंधान केंद्र बंगळुरु येथे केली. त्याचबराेबर त्यांनी भारतीय वंशाचे गाेवंश यावर स्वतंत्र एमएस्सी केली. त्यानंतर त्यांनी देशातील निरनिराळ्या पंचगव्यांच्या पद्धतींची माहिती गाेळा केली. त्यांचा एक पेपर ग्लाेबल जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च आणि त्याच बराेबर दुसरा निबंध इंटरनॅशनल जर्नल ऑफ आयुर्वेद यामध्ये प्रकाशित झाला आहे.